विश्व हिंदू परिषदेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क
विश्व हिंदू परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार पेठ येथील विश्व हिंदू परिषद कार्यालयात श्रीकृष्ण पूजेचे आयोजन करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे विशेष संपर्क आयाम प्रमुख श्री. श्रीकांतजी पोतनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण पूजन करण्यात आले.
यावेळी विश्व हिंदू परिषद कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. शांतिभाई लिंबाणी, जिल्हा मंत्री श्री. विनयजी बारड, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्णात गुंडकुपे, सौ. जान्हवीताई पाटील, सहमंत्री श्री. रावसाहेब चौगले, श्री. सुनीलजी शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच मातृशक्ती संयोजिका सौ. अर्चनाताई रानडे, बजरंगदल संयोजक श्री. सागर मेढे, बजरंगदल सहसंयोजक श्री. ओंकार रजपूत आणि दुर्गावाहिनी संयोजिका कु. राजलक्ष्मी आमणे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्याचा आढावा घेत आगामी काळात हिंदू समाजाचे संघटन, सेवा, संस्कार आणि धर्मरक्षणाच्या कार्याला अधिक बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांना शुभेच्छा देऊन करण्यात आला.

Comments
Post a Comment