आजचे राशिभविष्य

 आजचे राशिभविष्य 

१६ सप्टेंबर 




१६ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये, राशिभविष्य, शुभ कालावधी आणि मुहूर्त:-


     तुमच्यावर बुध आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव विनोदी असून तुम्ही मनाने उदार आहात. प्रकृतीबाबत तुमचे सतत कुरबुर चालू असते. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यून जाणवत असते. वरून तुम्ही शांत दिसत असला तरी मनात सदैव खळबळ चालू असते. त्यामुळे अनेकदा थोडासा रागीटपणा वाढतो. इतरांची लुडबुड आणि ढगाढवळ तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही नम्र आणि विनायशील असून स्वतःच्या अधिकाराचा बडेजाव करत नाहीत. तुमच्या वागण्यामध्ये सावधगिरी असते. तुम्हाला विश्रांतीची गरज असते. कामाबाबत अभ्यासु वृत्ती आणि पद्धतशीर पणा असतो. रहस्य कथा आणि विनोदी चित्रपट तुम्हाला आवडतात. दुसऱ्याच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून बारीक-सारीक गोष्टी सुद्धा तुमच्या लक्षात राहतात. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतात. तुमचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा उच्च प्रतीचे असतात. परंपरागत रुढीन बद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. मैदानी खेळ आणि प्रवास यांची आवड असते. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगणे तुम्हाला आवडते. तुम्ही चटपटीत असून तुम्हाला आळशी पण आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि विचार तर्कशुद्ध असतात. तुमचा दूर देशाशी किंवा परदेशाशी संबंध येतो. तुम्ही सर्वसाधारण लोकांमध्ये सहजासहजी मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकात तुम्ही तासान तास डोकं घालून बसतात. स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुमची वृत्ती साशंक असते आणि खात्री झाल्याशिवाय तुम्ही कोणावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. तुमच्यामध्ये धूर्त व्यापार वृत्ती असते. तुम्ही तुमचा अहंकार जोपासतात. मनाने तुम्ही मोकळे असून कृतीत मुक्तपणा असावा असे तुम्हाला वाटते. तुम्ही अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भावनांना आवर घातला पाहिजे कारण तुमच्याकडून इतरांना स्फूर्ती मिळते.



व्यवसाय:-  दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक, वैद्यकीय क्षेत्र, आयात निर्यात, परदेशाशी संबंधित व्यवसाय.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार.


शुभ रंग:- पिवळा आणि हिरवा.


शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती आणि लसण्या.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


बुधवार, १६ सप्टेंबर २०२६. भाद्रपद शुक्ल पंचमी / सकाळी ९.०० नंतर षष्ठी. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


"आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे"


नक्षत्र - विशाखा / संध्याकाळी ५.२३ नंतर अनुराधा. राशी - तुळ / सकाळी १०.४९ नंतर वृश्चिक.


वैधरुती योग.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


रवी लाभ चंद्र, चंद्र त्रिकोण मंगळ, चंद्र त्रिकोण नेपच्यून.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. कामात उत्साह राहील. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. नवीन जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवस चांगला आहे. सुरुवातीला काही अडथळे येतील, मात्र नंतर कामे मार्गी लागतील. प्रवास घडतील. आत्मविश्वास वाढेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धेत यश मिळेल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल ग्रहमान आहे. भाग्याची साथ मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.


कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अर्थकारण मजबूत होईल. नवीन आर्थिक संधी मिळतील. जमीन-जुमल्याच्या व्यवहारात लाभ होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सकाळचा वेळ संमिश्र आहे. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. आर्थिक लाभ होतील.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सकाळी १०.४९ नंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहारातून फायदा होईल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभदायक दिवस आहे. नवीन संधी चालून येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाचा ताण जाणवेल. संयमाने निर्णय घ्या. मोठे आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. कुटुंबासाठी वेळ द्याल.


मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. संध्याकाळनंतर परिस्थिती अनुकूल होईल. धाडसी निर्णय घेण्याची संधी मिळेल. व्यापारात लाभ होईल.


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


बुधवार, १६ सप्टेंबर २०२६. *शुभ कालावधी*


सकाळी ८.२३ ते सकाळी ९.२५ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.


सकाळी ९.२५ ते सकाळी १०.२८ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.


सकाळी १०.२८ ते सकाळी ११.२८ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.


सकाळी ११.२८ ते दुपारी १२.३०  - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.


दुपारी १२.३० ते दुपारी १.३० - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.


दुपारी १.३० ते दुपारी २.३२ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  

 

दुपारी २.३२ ते दुपारी ३.३३ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


दुपारी ३.३३ ते दुपारी ४.३४ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग, पूर्वज, दानधर्म.


दुपारी ४.३४ ते संध्याकाळी ५.३५ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, तीर्थयात्रा, प्राणायाम, दैवी उपासना.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


सप्टेंबर २०२६ महिन्यातील मुहूर्त:-


साखरपुडा ;-१२,१३,१५, १७,१९,२१,२३,२६


डोहाळजेवण:- १३,१६,१७


बारसे:- १२,१३,१५,१७,२१,२३, २४


जावळ:- १३,२३,२४,२५.


गृहप्रवेश :- १२,१३,१७,१९,२१,२३, २४.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

Comments