जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारणीची घोषणा
सुभाष रामुगडे यांची जिल्हाध्यक्षपदी, शेखर जाधव यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती; अक्षय जरग यांच्यावर युवा शहराध्यक्षपदाची जबाबदारी
कोल्हापूर १३ सिटी न्यूज नेटवर्क
जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारणीची महत्त्वपूर्ण घोषणा आज हॉटेल पॅव्हेलियन, कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. समित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांची जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी, तर शेखर आनंदराव जाधव यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. तसेच अक्षय विक्रम जरग यांच्यावर युवा शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
दरम्यान, भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर शहरातील जनसुराज्य शक्ती पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असून आगामी काळात पक्षाची वाटचाल अधिक गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख, शांतीभाई लिंबाणी, विशाल शिराळकर, संदीप पोवार, कुणाल शिंदे, रणजीत साळोखे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment