श्री दत्त तालीम मंडळाचा सामाजिक एकोपा जपणारा आदर्श; मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणरायाची आरती.

 श्री दत्त तालीम मंडळाचा सामाजिक एकोपा जपणारा आदर्श; मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणरायाची आरती.



कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क 

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देत जवाहरनगर येथील श्री दत्त तालीम मंडळाने एक आदर्श उपक्रम राबविला.



 मंडळाच्या वतीने भागातील मुस्लिम बांधव तसेच मोहन मलबारी फुटबॉल क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

तालमीचे अध्यक्ष आकाश कदम यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमातून धर्म वेगळे असले तरी माणुसकी आणि सामाजिक सलोखा सर्वांना एकत्र आणतो, असा सकारात्मक संदेश समाजापुढे ठेवण्यात आला.


आरतीच्या वेळी नगरसेवक मुस्ताक मलबारी, अख्तर इमानदार, पोलीस वैभव पाटील, यांच्यासह मोहन मलबारी फुटबॉल क्लबचे पदाधिकारी, मुस्लिम समाजबांधव आणि श्री दत्त तालीम मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शादाब अत्तार यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाला ते प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी आणि सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देत असल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पोचपावती देण्यात आली.


शादाब अत्तार हे कोणताही जात-धर्माचा भेद न मानता विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांना सहकार्य करीत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यांच्या या कार्यातून माणुसकीला धर्मापेक्षा मोठे स्थान देण्याचा संदेश मिळत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.


गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने श्री दत्त तालीम मंडळाने घेतलेला हा पुढाकार यावेळी उपस्थित सोहेल मलबारी, रफ़ीक़ शेख, आसिफ़ मुल्ला, नवाब सैय्यद, सद्दाम मुजावर, नूरेन मुजावर, शोएब मलबारी. तालमीचे सदस्य अभिजीत सोनवणे, शहाजी पवार, स्वप्निल मोरे,महेश सोनवणे,आशुतोष माने,शादाब मुल्ला,प्रमोद रामुगडे, परेश पवार, अनिल नाईक,निलेश सोनवणे व इतर कार्यकर्ते.

Comments