जिओ ग्राहकांना १२ महिन्यांसाठी Canva Pro मोफत; ₹४,००० पर्यंतची बचत
* ₹३९९ च्या रिचार्ज प्लॅनवर Canva Pro, तर ₹३४९ आणि त्यापेक्षा अधिक किमतीच्या निवडक २GB/दिवस डेटा प्लॅनवर Canva Pro Lite उपलब्ध
* ऑफर १६ सप्टेंबरपासून सुरू; MyJio ॲपवरून काही टॅप्समध्ये करता येणार ॲक्टिव्ह
मुंबई, 15 सिटी न्यूज नेटवर्क
जिओ ग्राहकांना आता कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता Canva मधील प्रीमियम डिझाइन टूल्सचा वापर करता येणार आहे. जिओ आणि Canva यांच्यात झालेल्या भागीदारीअंतर्गत पात्र ग्राहकांना १२ महिन्यांपर्यंत Canva Pro किंवा Canva Pro Lite मोफत मिळणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या ऑफरचे मूल्य ₹४,००० पर्यंत असून, १६ सप्टेंबरपासून MyJio ॲपच्या माध्यमातून ही ऑफर ॲक्टिव्ह करता येणार आहे.
ग्राहकांना Canva ची कोणती सेवा मिळणार, हे त्यांच्या जिओ रिचार्ज प्लॅनवर अवलंबून असेल. ₹३९९ च्या प्लॅनवर Canva Pro, तर ₹३४९ आणि त्यापेक्षा अधिक किमतीच्या पात्र २GB प्रतिदिन डेटा प्लॅनवर Canva Pro Lite उपलब्ध होईल. या ऑफरसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा छुपे आकारणी केली जाणार नाही.
या सुविधेचा थेट फायदा विद्यार्थी, कंटेंट क्रिएटर्स, व्यावसायिक आणि लघुउद्योजकांना होऊ शकतो. Canva च्या मदतीने मोबाइलवरूनच शालेय प्रकल्प, सोशल मीडिया पोस्ट, सादरीकरणे, मार्केटिंग साहित्य तसेच सण-उत्सवांच्या शुभेच्छापत्रांसाठी आकर्षक डिझाइन तयार करता येतील. हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्येही कंटेंट तयार करण्याची सुविधा उपलब्ध असेल.
Canva Pro Lite मध्ये लाखो प्रीमियम टेम्पलेट्स, फोटो, व्हिडिओ आणि फॉन्ट्ससोबत बॅकग्राउंड रिमूव्हर, Magic Resize आणि ५०GB क्लाउड स्टोरेज यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. Canva Pro मध्ये या सुविधांव्यतिरिक्त Canva AI, Content Planner, अधिक AI वापर मर्यादा आणि १००GB क्लाउड स्टोरेज यांसारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष किरण थॉमस म्हणाले, “या भागीदारीच्या माध्यमातून लाखो भारतीयांपर्यंत AI-आधारित डिझाइन टूल्स मोफत पोहोचवण्याचा जिओचा उद्देश आहे. यामुळे विद्यार्थी, क्रिएटर्स आणि लघुउद्योजकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत शिकणे आणि काम करणे अधिक सुलभ होईल.”
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी पात्र जिओ ग्राहकांनी MyJio ॲप उघडून Canva ऑफरवर टॅप करावे. त्यानंतर ते थेट डिझाइन तयार करण्यास सुरुवात करू शकतील.


Comments
Post a Comment