शारदीय नवरात्रौत्सव 2026 : पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची नंदादेवीच्या रूपातील पूजा

 पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची नंदादेवीच्या रूपातील पूजा !



कोल्हापूर 11 सिटी न्यूज नेटवर्क 

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात ११ ऑक्टोबरला प्रारंभ झाला. सकाळी तोफेची सलामी झाल्यावर  ‘घट बसवणे’ हा विधी पार पडला. पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची नंदादेवीच्या अलंकार रूपातील पूजा बांधण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसाठी भवानी मंडप परिसरातील शेतकरी संघाच्या इमारतीतून गाभारा दर्शनाची रांग लावण्यात आली आहे, तर गरुड मंडपाशेजारी मुखदर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी ४ ते ५ घंट्यांचा कालावधी लागत होता

Comments