स्पंदन चित्रकला स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांचा सहभाग

 स्पंदन चित्रकला स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांचा सहभाग



कोल्हापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने स्पर्धेचा आयोजन


कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क 

महात्मा गांधी जयंतीनिमित्त कोल्हापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी आणि बोधिसंगम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'स्पंदन चित्रकला स्पर्धे'चे भव्य आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर काँग्रेस कमिटी, दाभोळकर कॉर्नर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर शहरातील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार जयंत आसगावकर शहराध्यक्ष प्रवीण केसरकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.


या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचे विचार, सत्य, अहिंसा, स्वच्छता, शांतता आणि सामाजिक सलोखा यांसारख्या विविध विषयांवर आपल्या कल्पकतेतून सुंदर चित्रे साकारली. ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वी अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली.


इयत्ता ५ वी ते ७ वी गट प्रथम क्रमांक कृष्णा मोरे ,द्वितीय क्रमांक गौरविती पांचाळ , तृतीय क्रमांक अनुष्का शिंदे यांना देण्यात आला. तर उत्तेजनार्थ आध्या रुपेनिकर, तन्मय सुतार, मनिष प्रजापत, आध्या सूर्यवंशी , राजनंदिनी कोडसे , अनुष्का महालो, रिदान आदित्य यांना देण्यात आला. तर इयत्ता ८ वी ते १० वी गटात प्रथम क्रमांक अमेय पवार,द्वितीय क्रमांक अभय मोहिते, तृतीय क्रमांक वीरा प्रसाद निवळकर देण्यात आलं तर उत्तेजनार्थ पालस्मी जगताप, युवराज नाईक, मानस पाटील, समृद्धी काणे, खुशी कोडले, मुत्तप्पा हडपद, पृथ्वीराज कांबळे यांना देण्यात आला. यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. मुलांनी आपल्या कल्पना रंगांच्या माध्यमातून व्यक्त करणे ही अतिशय सुंदर गोष्ट असून, अशा उपक्रमांमुळे कलागुणांना वाव मिळतो, असा विश्वास  व्यक्त केला.


या प्रसंगी कोल्हापूर आमदार जयंत आसगावकर,  शहराध्यक्ष  प्रविण लक्ष्मणराव केसरकर, नगरसेविका दिपाली घाटगे, स्वाती कांबळे, सुषमा जरग, जयश्री कांबळे, भरत रसाळे, उदय पवार, संजय पटकारे, राजदीप भोसले, सरलाताई पाटील, भारती पोवार, वेदवती  मोहिते, संजय पोवार - वाईकर, विजयानंद पोळ, संदीप बिरांजे, उदय फाळके, रोहित पाटील, ओंकार मगदूम व गौरव कांबळे, स्नेहा पाटील बुद्धीहाळकर, सोनल देशपांडे व जयवंत वळकुंजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सोनल देशपांडे, संजय कुंभार, ओंकार शेळके आणि ओंकार वाघवेकर यांनी काम पाहिले. तसेच रेश्मा खाडे, यश आबोळे, हुसेन मोमीन, रेश्मा चांदणे, राजाराम शिंदे, रत्नाकर माळी, दीपक पाटील, शिवराज जाधव, उमर मुजावर आणि विशाल कासगुडे यांनी स्पर्धेच्या नियोजनासाठी सहकार्य केले.

Comments