कोल्हापुरात 'रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज'चे आयोजन;
रविवारी वेसरफमध्ये थरार
कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क
4X4 कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने 'रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज-बी अनस्टॉपेबल' या भव्य ऑफ-रोड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा रविवारी, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आजरी इको व्हॅली येथे वेसरफ, गगनबावडा येथे होणार असल्याची माहिती अश्विन शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले, गेल्या 15 दिवसांपूर्वी फॅमिलीसाठी आयोजित या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याच प्रतिसाद आणि उत्साहामुळे येत्या रविवारीही पुन्हा स्पर्धा आयोजित करीत आहोत. ऑफ-रोडिंगप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या चॅलेंजमध्ये चिखल, घाट आणि डोंगराळ ट्रेल्सवर गाड्यांचा थरार अनुभवता येणार आहे. 'अॅडव्हेंचर इथेच फुलते' या घोषवाक्यासह ही स्पर्धा होत आहे.
स्पर्धेचे नियोजन 4X4 कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू अश्विन शिंदे करीत असून ते म्हणाले, रविवारी एक दिवस होणाऱ्या (4X4) ऑफ रोडिंग स्पर्धेमध्ये पेट्रोल, डिझेल आणि महिला अशा तीन श्रेणीमधून एकूण 50 गाड्या आणि 200 स्पर्धक सहभागी होतील. महिला ऑफ-रोडर्सचेही स्वागत आहे. यामध्ये ब्लाइंड ड्राईव्ह, ट्रायल ड्राईव्ह झाल्यानंतर प्रत्येकी 100 पॉईंटचे असे 04 टाईम ट्रायलची एकून 400 पॉईंट स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे, मुंबई, नाशिक, गोवा, कर्नाटक येथील स्पर्धक सहभागी होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित ऑफ रोडरही उपस्थित यावेळी राहणार आहेत. पर्यटन, स्थानिकांना प्रोत्साहन आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व मदत अशा दुहेरी हेतूने होणाऱ्या या स्पर्धा होतील. विजेत्यांना मेडल, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात येणार आहे, तसेच पुढील ऑफ-रोड स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी चितेश मुंडोडी, पल्लवी यादव, डॉ. नचिकेत पाटील, कुणाल धुम्मा, दिग्विजय लोळगे, कृष्णकांत जाधव, विनायक शिंदे, राकेश जाधव आणि बाईक रायडर प्रशांत काशीद, फातिमा लाटकर आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment