आजचे राशीभविष्य
गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६
१ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या वृत्ती स्वतंत्र असून तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. सतत बदल करण्याकडे तुमचा ओढा असतो. आपला आयुष्यात काहीतरी सणसणाटी असावे असे तुम्हाला नेहमी वाटते. तुमच्या आयुष्यात बरेच चढउतार होतात. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. तुम्हाला कला आणि प्रवास यांची आवड आहे. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. प्रेम सहानुभूती आणि आदर हे तुमचे वैशिष्ट्य आहेत. उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्य, दागिने, कपडे, वाहने, घरे यांच्या तुम्हाला आकर्षण असते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात मात्र तुमचा स्वभाव खर्चिक आहे. तुम्हाला प्राणी प्रिय असतात. तुम्ही अत्यंत बुद्धिमान, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. हातातील कार्य सिद्धीस नेण्यासाठी तुम्ही पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुमच्यामध्ये संयम आहे. तुमची इच्छा शक्ती दांडगी आहे. प्रत्येक विषयाचा तुम्ही सखोल अभ्यास करतात. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि उत्साही आहे. वृत्ती संशोधक आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आशादायक आहे. तुम्हाला उत्तम भाषा चातुर्य आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि विश्लेषण करण्याची वृत्ती सूक्ष्म आहे.
व्यवसाय:- बौद्धिक, व्यवसाय, बँकिंग, सेल्स मॅनेजर, आयात निर्यात, पुस्तक विक्रेता, वृत्तपत्र व्यवसाय, इंटरियर डेकोरेटर, वकील, डिपार्टमेंट स्टोअर्स, डॉक्टर, केमिस्ट, तंत्रज्ञ.
शुभ दिवस:- रविवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, सोनेरी, नारंगी आणि निळा.
शुभ रत्न:- माणिक, पाचू, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६. भाद्रपद कृष्ण पंचमी / (दुपारी १२.३६ नंतर) षष्ठी. वर्षा ऋतू. पराभवनाम संवत्सर. शके १९४८. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज उत्तम दिवस आहे." षष्ठी श्राद्ध
नक्षत्र - रोहिणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
रवी त्रिकोण चंद्र, चंद्र लाभ शनी, चंद्र युती हर्षल.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील. कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. दिवस अत्यंत अनुकूल आहे. मन प्रसन्न राहील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवस चांगला आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. आर्थिक व्यवहारातून फायदा होऊ शकतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यात यश मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामात यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा, णा,ठा,पे,पो) भाग्याची साथ मिळेल. प्रवास कार्यसाधक ठरतील. आर्थिक स्थिती सुधारेल. धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवस लाभदायक आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळतील. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कौटुंबिक सौख्य लाभेल. कामात प्रगती होईल. घरगुती कामे पूर्ण होतील. प्रिय व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. प्रवास कार्यसाधक ठरतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रहमानामुळे कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबातील एखादी शुभवार्ता आनंद देईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दिवस चांगला आहे. कामात प्रगती होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यास दिवस अनुकूल आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments
Post a Comment