आजचे राशीभविष्य
शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६
२ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि शुक्राचा प्रभाव आहे. तुम्ही इतरांच्या सूचनांप्रमाणे कृती करतात. तुम्ही समाजप्रिय, नाविन्याची आवड असणारे तसेच प्रवासाची आवड असणारे आहात. तुम्ही बुद्धिमान, तल्लख, आणि शास्त्राची आवड असणारे आहात. तुमचा सहवास इतरांना प्रेरणादायक असतो. प्रेम, सहानुभूती आणि आदर या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटतात. तुमच्या बोलण्यात आकर्षकपणा आहे. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. चांगले आणि वाईट यामध्ये तुम्ही उत्तम प्रकारे भेदभाव करू शकतात. तुम्ही कल्पनारम्य आणि उत्साही आहात तसेच ममताळू आणि स्वातंत्र्यप्रिय देखील आहात. तुम्ही सतत कार्य मग्न असतात. तुम्ही विनम्र असून इतरांच्या गुणवैशिष्ट्यांचे कौतुक करतात. तुम्हाला कायद्याचे पालन करणे आवडते. स्वतःच्या वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींकडं तुम्ही आकर्षित होतात.
व्यवसाय:- लेखक, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, राजकीय क्षेत्र, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६. भाद्रपद कृष्ण षष्ठी / (सकाळी १०.१६ नंतर) सप्तमी. वर्षा ऋतू, पराभव नाम संवत्सर, शके १९४८. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
"आज व्यतिपात वर्ज्य दिवस आहे." सप्तमी श्राद्ध
नक्षत्र - मृग. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ / (दुपारी ३.४१ नंतर) मिथुन.
व्यतिपात योग.
चंद्र लाभ गुरू, चंद्र केंद्र नेपच्यून, मंगल त्रिकोण नेपच्यून, बुध केंद्र मंगल, बुध ष नेपच्यून.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) वर्ज्य दिवस आहे. आर्थिक व्यवहारात सावध राहा. कामात काही अडथळे येऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळा. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्यासाठी दिवस संमिश्र आहे. कामात प्रगतीसाठी प्रयत्न करावे लागतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दुपारी ३.४१ नंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. आत्मविश्वास वाढेल. कामात काही नवीन संधी मिळतील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस संमिश्र आहे. कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक व्यवहार जपून करा. वरिष्ठांशी व्यवहार करताना संयम ठेवा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा, णा,ठा,पे,पो) आर्थिक बाबतीत दिवस मध्यम आहे. कामाचा ताण जाणवेल. प्रवास करताना काळजी घ्या. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) काही कामे मार्गी लागतील, तर काही कामांना विलंब होऊ शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल. मोठे आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामात अडथळे येऊ शकतात. संयमाने परिस्थिती हाताळा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. अनावश्यक वाद टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवस संमिश्र आहे. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. कामात यश मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वर्ज्य दिवस असल्याने नवीन कामे सुरू करताना सावधगिरी बाळगा. कामात काही विलंब होऊ शकतो. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मित्रांचे सहकार्य मिळेल. कामातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आर्थिक व्यवहारात सावध राहा. कुटुंबासाठी वेळ द्याल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवस संमिश्र आहे. कामात काही अडथळे येतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. मात्र मोठे निर्णय घेताना घाई करू नका.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments
Post a Comment