आजचे राशीभविष्य
रविवार, ४ ऑक्टोबर २०२६
४ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. हर्षलच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात आणि तुमच्या विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. जीवनात बरेच चढउतार येतात. विलक्षण घटना घडतात. तुम्ही अत्यंत उत्साही प्रगतिशील आहात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही तिला तोंड देऊ शकतात. तुम्ही बुद्धिमान, चतुर, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला रूढी, परंपरा फारशा आवडत नाहीत. तसेच खोटेपणा देखील आवडत नाही. तुम्ही समाजप्रिय आहात आणि तुमच्या व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्हाला नवीन नवीन वस्तूंची तसेच प्रवासाची आवड आहे. तुम्ही डोके शांत ठेवून काम केल्यास तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्ही अहंकार टाळला पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा ठामपणा असतो. आयुष्यात तुम्ही सतत बदल करत असतात. तुमचा मित्र परिवार देखील सतत बदलत असतो.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, इंटरियर डेकोरेटर, बँकिंग, आयात निर्यात, शास्त्र, तसेच स्पेशालिस्ट डॉक्टर, संशोधन.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.
शुभ रंग:- निळा, पिवळा, नारंगी, राखाडी.
शुभ रत्न:- पोवळे, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
रविवार, ४ ऑक्टोबर २०२६. भाद्रपद कृष्ण नवमी. वर्षा ऋतू. पराभव नाम संवत्सर. शके १९४८. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
"आज चांगला दिवस आहे."
अविधवा नवमी. नवमी श्राद्ध.
नक्षत्र - पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन / (संध्याकाळी ६.३२) नंतर कर्क.
परीघ योग.
रवी प्रतियुती शनी, बुध ष हर्षल.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. कामात प्रगती होईल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दिवस चांगला आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन ओळखींचा फायदा होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संध्याकाळी ६.३२ नंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास कार्यसाधक ठरतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. कामातील अडथळे दूर होतील. नवीन संधी मिळतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन करार होऊ शकतात. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दिवस लाभदायक आहे. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. नोकरीच्या इच्छुकांना चांगली बातमी मिळू शकते. मेहनतीचे फळ मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पंचम स्थानी चंद्रामुळे आनंददायी घटना घडतील. नवीन ज्ञान मिळेल. संततीकडून चांगली बातमी मिळू शकते. सर्जनशील कामात यश मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामात प्रगती होईल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होऊ शकतो. नवीन ओळखी होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लाभदायक दिवस आहे. पराक्रमाच्या जोरावर कामे पूर्ण कराल. भावंडांचे सहकार्य मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. आर्थिक लाभ होतील. मात्र खर्चाचे नियोजन करा. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments
Post a Comment