आजचे राशीभविष्य
बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६
७ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचे ध्येय अत्यंत उच्च असतात. परंपरागत प्रथांबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा अनुभव घेतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून व्यवहारात त्याचा उपयोग होतो. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला हौस असते. तुम्हाला क्रीडा, प्रवास, संगीत याची आवड असून तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात आणि दुरदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही सर्वसाधारण किंवा तुमच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसांमध्ये मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आवडते. तुम्हाला स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही संशयी असून प्रत्येक गोष्टीची खात्री झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्व नियोजन करतात. तुमच्यामध्ये दुरदर्शीपणा आणि व्यापारी वृत्ती असते. मनाने तुम्ही मोकळे असून तुमच्या कृतीमध्ये मुक्तपणा आहे मात्र तुमचे मन कायम अस्वस्थ असते.
व्यवसाय:- आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, हिरवा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, पुष्कराज, लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
![]() |
| सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६. भाद्रपद कृष्ण द्वादशी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज उत्तम दिवस आहे"
द्वादशी श्राद्ध.
नक्षत्र - मघा/ पूर्वा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह.
बुध युती शुक्र, चंद्र लाभ बुध, चंद्र लाभ शुक्र, चंद्र केंद्र हर्षल, मंगळ लाभ हर्षल.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक व्यवहारातून लाभ होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवस अनुकूल आहे. बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. बोलण्याचा प्रभाव वाढेल. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल. अचानक एखादी चांगली बातमी मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र ग्रहमान आहे. घरगुती कामात वेळ जाईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. प्रिय व्यक्तीशी संवाद साधताना गैरसमज टाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. मान-सन्मान मिळतील. अकल्पित लाभ होतील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन संधी चालून येतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. मौल्यवान वस्तूची खरेदी होऊ शकते.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. सहलीचे योग येतील. आर्थिक लाभ होतील. मात्र निर्णय घेताना घाई करू नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) स्पर्धेत यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. वरिष्ठांकडून कौतुक होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भाग्योदय होईल. प्रवासाचे योग आहेत. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारातून फायदा होईल. जमीन-जुमल्याच्या कामात प्रगती होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवीन ओळखी होतील. नोकरी-व्यवसायात बदलाच्या संधी मिळतील. मनासारख्या घटना घडतील. मात्र खर्चाचे प्रमाण वाढू शकते.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवस चांगला आहे. अपेक्षित संधी चालून येईल. प्रेमात यश मिळू शकते. आर्थिक लाभ होतील. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


Comments
Post a Comment