आजचे राशीभविष्य
गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६
८ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शनी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे त्यामुळे जीवनात बऱ्याच वेळा कोणत्याही गोष्टी वेळच्यावेळी होत नाहीत. शिस्त, गांभीर्य, दृढपणा तसेच कर्तव्याची जाणीव तुमच्यात प्रामुख्याने आढळून येते. तुम्ही सखोल विचारांचे आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुम्ही समतोल विचार करतात आणि कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू समजून घेतात तरी देखील तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात. निसर्ग, सौंदर्य, संगीत, फुलं यांची तुम्हाला आवड असते. चार चौघांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी आणि बुद्धिमान आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून कार्य मग्न असतात. तुम्ही कार्यक्षम आणि अधिकार गाजवणारे आहात. तुम्हाला तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांबद्दल आपुलकी आणि आदर असतो. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला भेटून इतरांना आनंद होतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात. व्यवहारातील सर्व गोष्टी तुम्ही सुलभतेने हाताळू शकतात. आर्थिक बाबतीत तुमचे नियोजन उत्तम असते. इतरांच्या समस्या आणि दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. तुम्ही इतरांसाठी एक आदर्श असतात.
व्यवसाय:- वैद्यकीय शास्त्र, गणिती, कंपनी सेक्रेटरी, संशोधन, वैचारिक लेखन, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, व्यवस्थापक व उद्योग क्षेत्र, बौद्धिक क्षेत्र.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- राखाडी, काळा, जांभळा, गडद निळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६. भाद्रपद कृष्ण त्रयोदशी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज वर्ज्य दिवस आहे"
प्रदोष. त्रयोदशी श्राद्ध.
नक्षत्र - पूर्वा / उत्तरा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. अनावश्यक खर्च टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरी-व्यवसायात संमिश्र अनुभव येतील. कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवा. आर्थिक बाबतीत घाई करू नका.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रवासाचे योग आहेत. काही कामे रखडू शकतात. मौल्यवान वस्तू सांभाळा. प्रिय व्यक्तीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) घरगुती कामात वेळ व्यतीत होईल. मनावर ताण जाणवू शकतो. आर्थिक व्यवहार जपून करा. महत्त्वाचे निर्णय आज टाळलेले बरे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आज वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्याकडे लक्ष द्या. विनाकारण धाडस करू नका.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. खर्च वाढू शकतो. सहकाऱ्यांशी वाद टाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मात्र आर्थिक गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. घाईचे निर्णय टाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचे म्हणणे ऐका. व्यवसायात सावधपणे व्यवहार करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भाग्याची साथ काहीशी कमी राहील. प्रवासात अडथळे येऊ शकतात. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा. आर्थिक व्यवहार पुढे ढकलणे योग्य ठरेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक व्यवहारात सावधानता आवश्यक आहे. अडलेली कामे पूर्ण होण्यास विलंब होईल. विनाकारण कोणतीही जोखीम घेऊ नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नोकरी-व्यवसायात काही अडचणी जाणवतील. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचे निर्णय टाळा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवस संमिश्र आहे. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. कामात विलंब होईल. धार्मिक कार्यात मन रमवा. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments
Post a Comment