आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

शनिवार, १० ऑक्टोबर २०२६.






 १० ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर रवी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही जीवनात उच्च तेच निवडतात. फार सखोल अभ्यास न करता देखील तुम्ही इतरांवर प्रभाव पाडू शकतात. आई-वडील पत्नी इतर नातेवाईक यांच्यापासून तुम्हाला लाभ होतात. तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे. तुमचा स्वभाव धडपडा आहे. तुमच्या वृत्ती स्वतंत्र असून तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. सतत बदल करण्याकडे तुमचा ओढा असतो. आपला आयुष्यात काहीतरी सणसणाटी असावे असे तुम्हाला नेहमी वाटते. तुमच्या आयुष्यात बरेच चढउतार होतात. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. तुम्हाला कला आणि प्रवास यांची आवड आहे. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. प्रेम सहानुभूती आणि आदर हे तुमचे वैशिष्ट्य आहेत. उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्य, दागिने, कपडे, वाहने, घरे यांच्या तुम्हाला आकर्षण असते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात मात्र तुमचा स्वभाव खर्चिक आहे. तुम्हाला प्राणी प्रिय असतात. तुम्ही अत्यंत बुद्धिमान, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. हातातील कार्य सिद्धीस नेण्यासाठी तुम्ही पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुमच्यामध्ये संयम आहे. तुमची इच्छा शक्ती दांडगी आहे. प्रत्येक विषयाचा तुम्ही सखोल अभ्यास करतात. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि उत्साही आहे. वृत्ती संशोधक आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आशादायक आहे. तुम्हाला उत्तम भाषा चातुर्य आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि विश्लेषण करण्याची वृत्ती सूक्ष्म आहे. बढाईखोरपणा आणि उतावळेपणा   टाळला पाहिजे. वयाच्या ४५ व्या वर्षी उत्कर्ष होतो.


व्यवसाय:-  बौद्धिक, व्यवसाय, बँकिंग, सेल्स मॅनेजर, आयात निर्यात, पुस्तक विक्रेता, वृत्तपत्र व्यवसाय, इंटरियर डेकोरेटर, वकील, डिपार्टमेंट स्टोअर्स, डॉक्टर, केमिस्ट, तंत्रज्ञ.


शुभ दिवस:- रविवार, गुरुवार आणि शुक्रवार.


शुभ रंग:- पिवळा, सोनेरी, नारंगी आणि निळा.


शुभ रत्न:- माणिक, पाचू, मोती.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)



*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


शनिवार, १० ऑक्टोबर २०२६. भाद्रपद अमावस्या. पराभव नाम संवत्सर, शके १९४८. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज वर्ज्य दिवस आहे"


सर्वपित्री अमावस्या.


नक्षत्र - हस्त/ चित्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या. (एइंद्र योग, चतुष्पाद आणि नाग करण) 


रवी चित्रा नक्षत्रात, रवी युती चंद्र, चंद्र लाभ गुरू, चंद्र प्रतियुती शनी, शुक्र केंद्र मंगळ.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) मनावर काहीसा ताण राहील. नोकरी-व्यवसायात संमिश्र अनुभव येतील. अनावश्यक खर्च टाळा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवस संमिश्र आहे. प्रवासात अडथळे येऊ शकतात. मौल्यवान वस्तू सांभाळा. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवा.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक व्यवहार जपून करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. धार्मिक कार्यात मन रमवा. मोठी कामे आज टाळलेली बरी.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी संयम ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या. खर्च वाढू शकतो.


कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) काही सुखद अनुभव येतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मात्र नवीन कामाची सुरुवात करण्याची घाई करू नका. आर्थिक व्यवहार जपून करा.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांचे सहकार्य मिळेल. घरगुती कामे पूर्ण होतील. मात्र महत्त्वाचे निर्णय आज टाळा.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामाचा ताण जाणवेल. व्यवसायात सावधगिरी बाळगा. आर्थिक लाभ मिळतील पण खर्चही वाढेल. गुपिते कोणालाही सांगू नका.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा. प्रवासाचे योग आहेत. हरवलेली वस्तू सापडण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. संततीची काळजी घ्या. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य मिळेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा.


मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र-गुरूचा शुभ योग आहे. मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. मात्र वर्ज्य दिवस असल्याने नवीन कामाची सुरुवात टाळा.


सर्वपित्री अमावस्येनिमित्त पितरांचे स्मरण व तर्पण करून त्यांचे आशीर्वाद घ्या.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments