शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना सांगली जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा सांगली-मिरज परिसरात प्रचार दौरा; शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद
सांगली १५ सिटी न्यूज नेटवर्क
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराला सांगली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी सांगली-मिरज परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देत संस्थाचालक, पदाधिकारी, प्राचार्य आणि शिक्षकांशी संवाद साधला. या दौऱ्यामुळे कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे पाठबळ मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
या प्रचार दौऱ्यादरम्यान संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चेअरमन संजय भोकरे, सांगली शिक्षण संस्थेचे चेअरमन श्रीराम कुलकर्णी, श्री वसंतराव बंडुजी पाटील ट्रस्टचे ट्रस्टी समीर बिरनाळे, अप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रतिनिधी, आटपाडी येथील महाराणी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटीचे आर. एस. चोपडे यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ, भारतीय जनता पार्टीचे सांगली शहराध्यक्ष प्रकाश ढंग, यशवंत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मोहन गायकवाड, मिरज येथील लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालयाचे प्रतिनिधी, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुहास पाटील, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अतुल माने, मिरज विद्या समितीचे संस्थापक अनिलभाऊ कुलकर्णी, शैलेश दादा देशपांडे आणि प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांच्यासह अनेक मान्यवरांशी भेटीगाठी झाल्या.
शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक संस्थांसमोरील आव्हाने, शिक्षण क्षेत्रातील बदल आणि शिक्षकांना विधान परिषदेत सक्षम प्रतिनिधित्व मिळण्याची गरज या विषयांवर या दौऱ्यात चर्चा झाली. शिक्षकांच्या समस्या समजून घेणारे, त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवणारे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनदरबारी प्रभावी पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व विधान परिषदेत पोहोचावे, यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांशी संवाद साधण्यावर या दौऱ्यात भर देण्यात आला. संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटींमुळे प्रचाराला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
या दौऱ्यावेळी माजी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य अर्जुन जाधव, मिरज तालुका प्रमुख व्होरे सर, आजीव सेवक व्ही. एस. पाटील सर, विश्वास अवताडे, अभिजीत चव्हाण, शिवाजी गोडसे, अभिषेक चौगुले, आप्पासाहेब बिराजदार, सुहास वाघमोडे, संजय पाटील यांच्यासह गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांशी साधलेला संवाद आणि मान्यवरांच्या भेटीगाठींमुळे शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सक्षम प्रतिनिधित्व उभे करण्याच्या भूमिकेला या दौऱ्यातून बळ मिळाले.

Comments
Post a Comment