आजचे राशीभविष्य
सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६.
१२ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र आणि गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा ओढा सुखासीन जीवनाकडे असतो. तुम्हाला आयुष्यात सहजपणे मान- सन्मान मिळतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात मात्र त्यातून तुम्हाला अपेक्षाभंग मिळतो. तुमच्याशब्दात आणि कृतीत ठामपणा असतो. वायफळ बडबड तुम्हाला आवडत नाही. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला प्रिय आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा आहे. धर्माचा तुम्ही डोळसपणे अभ्यास करतात. तुम्ही न्यायप्रेमी आणि इतरांच्या साठी कष्ट घेणारे आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यात रुबाबदारपणा, काटेकोरपणे आणि व्यवस्थितपणा आहे. दुर्बल लोकांना तुम्ही नेहमीच मदत करतात. तुमच्यामध्ये अनेक कौशल्य आहेत. क्रीडा प्रकारांची तुम्हाला आवड आहे. हाती घेतलेल्या कार्यासाठी तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे आणि जीवनाकडे तुम्ही आशादायकपणे बघतात. स्वतःच्या प्रेमसंबंधांंबाबत तुम्ही आशादायी आणि संयमी असतात. प्रेमात तुम्ही सावधपणे पाऊल टाकतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार असून आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर तुम्ही यशस्वीपणे मार्ग काढू शकतात. वयाच्या ३९ नन्तर आयुष्यात स्थैर्य येते. अनाठायी काळजी करण्याचा स्वभाव असतो. त्यामुळे मन दुःखी कष्टी असते.
व्यवसाय:- राजकीय क्षेत्र, मंत्री, न्यायाधीश, सचिव, शैक्षणिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेठीस्ट, लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६. अश्विन शुक्ल द्वितीया/ (रात्री १०.१४ नंतर) तृतीया. पराभव नाम संवत्सर. शरद ऋतू. शके १९४८.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
चंद्र नक्षत्र - स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तूळ.
*आज शुभ दिवस*. विषकुंभ योग. (चंद्रदर्शन संध्याकाळी ७.१९ पर्यंत)
चंद्र केंद्र मंगळ, चंद्र युती बुध, चंद्र युती शुक्र.
मेष:- अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. नवीन कामे मार्गी लागतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. मात्र रागावर नियंत्रण ठेवा.
वृषभ:- दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासात सावधगिरी बाळगा.
मिथुन:- लाभदायक दिवस आहे. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. नवीन ओळखीतून फायदा होईल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. कामाचा ताण जाणवू शकतो. आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. घाईघाईने निर्णय घेऊ नका.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक संबंध जपण्याचा प्रयत्न करा.
कन्या:- दिवस चांगला आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारातून लाभ मिळतील. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अनावश्यक खर्च टाळा.
तूळ:- तुमच्याच राशीत चंद्र असल्याने दिवस उत्साहवर्धक आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. नातेसंबंध सुधारतील. मात्र भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामात काही अडथळे येऊ शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवा.
धनु:- लाभदायक दिवस आहे. नवीन कामाच्या संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाच्या कामात सातत्य ठेवा.
मकर:- अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक लाभ होतील. वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. कामाचा ताण वाढू देऊ नका.
कुंभ:- शुभ दिवस आहे. नवीन कामांना सुरुवात करण्यासाठी अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. खर्चाचे नियोजन करा.
मीन:- संमिश्र दिवस आहे. कामात सावधगिरीने पुढे जावे. आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
8087520521.

Comments
Post a Comment