आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६





१३ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर हर्षल आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही बुद्धिमान असून उंचापुरा असतात. वयाच्या ३१ पासून महत्वाची वर्षे सुरू होतात. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आणि चिकाटी असते. कन्त्यही अडचणींवर तुम्ही मात करतात. प्रकृती सुदृढ आणि विकारवश असते. जीवनात अनेक उलाढाली होतात. स्मरणशक्ती चांगली असते. तुमच्या योजनांमध्ये वारंवार बदल होतात. जीवनात जे मिळवायचे ते शांतपणे मिळवतात. गाजावाजा केलेला आवडत नाही. हर्षलच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात आणि तुमच्या विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. जीवनात बरेच चढउतार येतात. विलक्षण घटना घडतात. तुम्ही अत्यंत उत्साही प्रगतिशील आहात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही तिला तोंड देऊ शकतात. तुम्ही बुद्धिमान, चतुर, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला रूढी, परंपरा फारशा आवडत नाहीत. तसेच खोटेपणा देखील आवडत नाही. तुम्ही समाजप्रिय आहात आणि तुमच्या व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्हाला नवीन नवीन वस्तूंची तसेच प्रवासाची आवड आहे. तुम्ही डोके शांत ठेवून काम केल्यास तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्ही अहंकार टाळला पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा ठामपणा असतो. आयुष्यात तुम्ही सतत बदल करत असतात. तुमचा मित्र परिवार देखील सतत बदलत असतो. हुशार अन बुद्धिमान वर्तुळात वावरणे तुम्हाला आवडते. मनावर घेतल्यास जीवनात अशक्य असे काहीच राहत नाही.



व्यवसाय:- जाहिरात माध्यम, इंटरियर डेकोरेटर, बँकिंग, आयात निर्यात, शास्त्र, तसेच स्पेशालिस्ट डॉक्टर, संशोधन.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.


शुभ रंग:- निळा, पिवळा, नारंगी, राखाडी.


शुभ रत्न:- पोवळे, मोती, हिरा.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*



*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


 मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६

आश्विन शुक्ल तृतीया. शरद ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८३.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. चंद्र-गुरू केंद्र योगामुळे काही बाबतींत अनुकूलता लाभेल. महत्त्वाची कामे करताना संयम आणि नियोजन आवश्यक आहे. नक्षत्र - विशाखा. राशी - तूळ / रात्री ७.१३ नंतर वृश्चिक. आज वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी योग्य वेळ पाहून निर्णय घ्यावेत.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रवासाचे योग येतील. आर्थिक बाबतीत नियोजन केल्यास फायदा होईल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) कामाचा व्याप वाढू शकतो. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. जवळच्या व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवा.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) आजचा दिवस अनुकूल राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता असून कुटुंबातील व्यक्तींकडून आनंदाची बातमी मिळेल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. नवीन संधींचा लाभ घेता येईल. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना काळजी घ्या.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात फायदा होण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्र आपल्या राशीत असल्याने मन प्रसन्न राहील. चंद्र-गुरू केंद्र योगामुळे कामात अनुकूलता मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक व्यवहार करताना योग्य नियोजन करा.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) आज काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो. संयमाने परिस्थिती हाताळा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नवीन निर्णय घेताना घाई करू नका.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मित्र आणि सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. नोकरी-व्यवसायात लाभदायक घडामोडी होतील. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात नियोजन महत्त्वाचे ठरेल. कुटुंबासाठी वेळ द्याल.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) नवीन कामे करण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) दिवस उत्साहवर्धक राहील. कामात सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.


– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments