आजचे राशीभविष्य
बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६
१४ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही दिसायला देखणे असून लोकप्रिय असतात. इतरांना 'न' दुखवण्याचा स्वभाव असतो. फारशी बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. हातचे राखून बोलतात आणि वागतात. तुम्ही चाणाक्ष असून निरीक्षण शक्ती चांगली असते. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते. तुम्ही स्वतः कलाकार असून कला प्रिय देखील आहात. मनाने तुम्ही उदार आणि विचारी असून इतरांची कदर करतात. तुमच्या सानिध्यात आल्यास इतरांना आनंद होतो. तुमचे वागणे आणि बोलणे मोहक आणि आकर्षक आहे. तुम्ही समजूतदार असून विविध खेळांमध्ये यश मिळते. इतरांचे कच्चे दुवे तुम्ही बरोबर हेरतात. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगायची तुम्हाला बरीच हौस असते. तुमचे उद्दिष्ट ठाम असते आणि त्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, वाहने, घरे, दाग दागिने आणि सुगंध द्रव्य तुम्ही वापरत असतात. विविध समारंभांमध्ये भाग घेणे आणि समाजात मिसळणे तुम्हाला आवडते. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. इतरांना मदत करणे तुम्हाला मनापासून आवडते. धर्म आणि तत्वज्ञान तसेच प्रवास याची तुम्हाला आवड आहे. स्वतःच्या व्यवसायात यश मिळते. स्त्रिया सुखी वैवाहिक जीवन अनुभवतात. मात्र प्रसूतीत त्रास संभवतो. श्रीमंत व्यक्तीशी विवाह होतो. गूढ विद्यांची आवड असते. भावनांवर ताबा ठेवण्याची कला अवगत असते.
व्यवसाय:- अकाउंट, बँकिंग, दळणवळण, वाहन विक्री, इलेक्ट्रॉनिक्स, दागिने विक्री, कपडे, कॉस्मेटिक्स.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, हिरवा.
शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६. अश्विन शुक्ल चतुर्थी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे" विनायकी चतुर्थी.
नक्षत्र - अनुराधा. आज जमलेल्या बाळाची राशी - वृश्चिक. (विष्टी करणं शांती)
चंद्र त्रिकोण मंगळ, चंद्र त्रिकोण शनी, चंद्र प्रतियुती हर्षल, चंद्र त्रिकोण नेपच्यून.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सकाळचा काळ अनुकूल आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक व्यवहारात लाभ होतील. मात्र दुपारनंतर संयमाने वागा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवसाची सुरुवात चांगली होईल. बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन माहिती मिळेल. प्रवासात किंवा व्यवहारात अनपेक्षित बदल संभवतात. बोलताना शब्द जपून वापरा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. महत्त्वाची कामे शक्यतो दुपारी १२.०० पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) सकाळचा काळ अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात संधी मिळतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. दुपारनंतर महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचला.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक व्यवहार करताना तपशील तपासून घ्या. सहकारी आणि कुटुंबीयांशी संवाद साधताना गैरसमज टाळा.
तूळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवसाची सुरुवात चांगली होईल. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. मात्र अचानक बदल झाल्यास शांतपणे परिस्थिती हाताळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) तुमच्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. मात्र अनपेक्षित घटनांमुळे मन विचलित होऊ देऊ नका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भाग्याची साथ मिळेल. कामात नवीन संधी उपलब्ध होतील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रवासात सावधगिरी बाळगा आणि आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) अडलेली कामे पुढे सरकतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र अनपेक्षित अडथळ्यांमुळे नियोजनात बदल करावा लागू शकतो.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. भागीदारीच्या कामात स्पष्टता ठेवा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. इतरांच्या बोलण्यावरून त्वरित निर्णय घेऊ नका.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) कामात प्रगती होईल. सहकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आर्थिक नियोजनासाठी सकाळचा वेळ अनुकूल आहे. दुपारनंतर संयम राखा आणि महत्त्वाच्या व्यवहारात काळजी घ्या.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521.

Comments
Post a Comment