आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६




 १७ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर शनी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही उत्कृष्ट संघटक, महत्वाकांक्षी, क्रियाशील व्यक्ती आहात. तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होतात आणि लोक कल्याण साठी झटतात. गूढ विद्या, हिप्नॉटिझम यांची आवड असते. ठराविक चाकोरीतून जाणे तुम्हाला आवडत नाही. जीवनात बऱ्याच वेळा कोणत्याही गोष्टी वेळच्यावेळी होत नाहीत. शिस्त, गांभीर्य, दृढपणा तसेच कर्तव्याची जाणीव तुमच्यात प्रामुख्याने आढळून येते. तुम्ही सखोल विचारांचे आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुम्ही समतोल विचार करतात आणि कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू समजून घेतात तरी देखील तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात. निसर्ग, सौंदर्य, संगीत, फुलं यांची तुम्हाला आवड असते. चार चौघांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी आणि बुद्धिमान आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून कार्य मग्न असतात. तुम्ही कार्यक्षम आणि अधिकार गाजवणारे आहात. तुम्हाला तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांबद्दल आपुलकी आणि आदर असतो. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला भेटून इतरांना आनंद होतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात. व्यवहारातील सर्व गोष्टी तुम्ही सुलभतेने हाताळू शकतात. आर्थिक बाबतीत तुमचे नियोजन उत्तम असते. इतरांच्या समस्या आणि दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. तुम्ही इतरांसाठी एक आदर्श असतात. भावनांच्या बाबतीत तुम्ही काहीसे थंड प्रवृत्तीचे असतात. संशोधन आणि ज्ञान यांकडे ओढा असतो. तुम्हाला नेतृत्व गाजवण्याची आवड असते मात्र काही वेळेस भित्रेपणा आड येतो.



व्यवसाय:-  वैद्यकीय शास्त्र, गणिती,  कंपनी सेक्रेटरी, संशोधन, वैचारिक लेखन, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, व्यवस्थापक व उद्योग क्षेत्र, बौद्धिक क्षेत्र.


शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- राखाडी, काळा, जांभळा, गडद निळा.


शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६. अश्विन शुक्ल सप्तमी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


नक्षत्र - मूळ / सकाळी ९.४७ नंतर पूर्वाषाढा. राशी - धनु. (अतिगंड योग शांती)


वृद्धितिथी.


चंद्र केंद्र शनी.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवस संमिश्र आहे. कामात काही अडथळे येऊ शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) नोकरी-व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील. कामाचा ताण जाणवू शकतो. आर्थिक नियोजन करा. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) प्रवासाचे योग आहेत. कामात विलंब होऊ शकतो. आर्थिक व्यवहार जपून करा. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. इतरांशी संवाद साधताना गैरसमज टाळा.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. मनावर ताण जाणवू शकतो. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याचा विचार करा.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) नोकरी-व्यवसायात संमिश्र अनुभव येतील. कामातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक व्यवहारात नियोजन आवश्यक आहे. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. कौटुंबिक बाबतीत शांतपणे निर्णय घ्या.


तूळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. घरगुती कामात वेळ जाईल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) कामाचा ताण जाणवू शकतो. नोकरी-व्यवसायात संयमाने काम करा. आर्थिक बाबतीत काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना गैरसमज टाळा.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्या राशीत चंद्र असल्याने मन काहीसे अस्वस्थ राहू शकते. कामात अडथळे जाणवतील. आर्थिक व्यवहार जपून करा. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) अडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. वरिष्ठांशी व्यवहार करताना संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी शांतपणे परिस्थिती हाताळा.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) दिवस संमिश्र आहे. कामात विलंब होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा.


कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

8087520521

Comments