कोल्हापुरातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सोहम खासबारदार अजिंक्य; शर्वरी कबनूरकर उपविजेती
कोल्हापूर ०५ सिटी न्यूज नेटवर्क
कै. दत्तात्रेय विठ्ठल जोशी यांच्या स्मरणार्थ अनुज् चेस ॲकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सोहम खासबारदार याने अजिंक्यपद पटकावले, तर शर्वरी कबनूरकर हिने उपविजेतेपद मिळविले.
बापूसाहेब साळुंखे सभागृह, कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक अभिजीत खतकर व अरुण पाटील (टोपकर) यांच्या हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले. स्पर्धेत एकूण सात फेऱ्या घेण्यात आल्या. सोहम खासबारदार व श्रीधर तावडे यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. सोहमने सातपैकी ६.५ गुण मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. शर्वरी कबनूरकर हिने व्यंकटेश खाडे-पाटील याच्यावर मात करत सहा गुणांसह उपविजेतेपद मिळविले.
खुल्या गटातील विजेते : श्रेयश गाताडे (६), अर्णव पोर्लेकर (६), सूरज जाधव (६), श्रीधर तावडे (६), व्यंकटेश खाडे-पाटील (५.५), शशिकांत कबनूरकर (५.५), ओजस व्हनमाने (५.५) आणि हरीश पाटील (५) यांनी अनुक्रमे तिसरा ते दहावा क्रमांक मिळविला.
८ वर्षांखालील गट : आरुष सणस प्रथम, कृष्णराज चव्हाण द्वितीय, रियांश गिरगावकर तृतीय, तर श्रीनेय पालनकर चौथा.
१० वर्षांखालील गट : रुद्रवीर पाटील प्रथम, संस्कार वनीरे द्वितीय, तर भोईटे शरद तृतीय.
१२ वर्षांखालील गट : ध्रुव गोयल प्रथम, श्रीतेज भाट द्वितीय, रणवीर पुनुगडे तृतीय, तर सक्षम नाटेकर चौथा.
१४ वर्षांखालील गट : अद्विक विचारे प्रथम, शौर्य कटके द्वितीय, अर्जुन चौगुले तृतीय, तर आयान शेख चौथा.
सिनियर प्लेअर गटात मीना वरने यांनी प्रथम, तर वंदना डोंगरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. बेस्ट प्लेअर पुरस्कार अथर्व कुंभार याला मिळाला. बेस्ट लेडीज पुरस्कार अनुष्का पाटील व प्रियदर्शनी ठोमके यांनी पटकावला.
अनुज् चेस ॲकॅडमी गटात सार्थक घुले प्रथम, अवनीश तानुगडे द्वितीय, शिवम साबळे तृतीय, तर पार्थ सुतार चौथा ठरला.
स्पर्धेत प्रीशा पाटील, सर्वेश गुरव, पूर्वा सुतार, अभीज्ञ चौगुले, गुरुवीर लंबोरे, स्वयम पाटील, स्वराज पाटील, शौर्य कांडेकरी, सईद पिंजारी, अंजली चौगुले, हर्षवर्धन पाटील, रोनक साळुंखे, वरद खोत व प्रथमेश गायकवाड यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धेत १६ फिडे रेटेड खेळाडूंसह एकूण १०६ खेळाडूंनी सहभाग घेतला. पंच म्हणून शैलेश होनकट्टी, कपिल ठोंबरे व प्रियंका ठोंबरे यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण समारंभ मा. श्रीकांत जोशी, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव कृष्णात पाटील, अनुज् चेस ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक बाबुराव पाटील, काशिनाथ गुळवणी व अश्विनी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनुष्का पाटील, अनुज पाटील व अनुराग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
.jpg)
Comments
Post a Comment