स्वयंसिद्धातर्फे चार दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन
कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क
स्वयंसिद्धातर्फे महिलांच्या कलागुणांना व उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी २ ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चार दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी १४ वी गल्ली, कोल्हापूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन मा. सौ. सृष्टी करण जाधव, नगरसेविका, कोल्हापूर महानगरपालिका यांच्या शुभहस्ते झाले.
प्रदर्शनात शोभेच्या व कलात्मक वस्तू, दागिने, पर्स, स्टोन रांगोळी, सिल्क साड्या व ड्रेसेस, वाळवणीचे पदार्थ, कोरडे तसेच दिवाळी फराळा व खाजा-पिजा-लेजा अशा भरपूर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहेत.
या प्रदर्शनादरम्यान दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत विविध स्पर्धा व सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
• शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी भारतीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा
• रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी (इ. १ ते ४ थी व ५ ते ८ वी अशा दोन गटांसाठी न्यूजपेपरपासून आकर्षक वस्तू बनविण्याची स्पर्धा
• तर सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी मोमोज सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.
महिलांच्या संघटित प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शन स्त्री-पुरुष सर्वांसाठी खुले आहे.



Comments
Post a Comment