आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६





 २९ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर चंद्र आणि शुक्राचा प्रभाव आहे. तुम्ही अभ्यासू वृत्तीचे असून एक उत्तम शिक्षक असतात. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी असते. तुम्ही नेहमी सावध असतात मात्र प्रेमात कोणतीही पातळी ओलांडण्यास तयार असतात. तुमचाविवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो आणि विवाहानंतर भाग्योदय होतो. उच्च पदस्थ लोकांची तुम्हाला मदत मिळते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही कष्टाळू असून योग्य निर्णय घेणारे आहात. प्रेमाविषयी तुमचा दृष्टीकोन भावनिक असतो. तुम्ही मोठ्या पदावरील जबाबदारीच्या जागा स्वीकारतात आणि यशस्वी होतात. स्वभावाने तुम्ही शांत असलात तरी स्वतःच्या मनाशी तडजोड करत नाहीत. भाषणे, लेखन, रेडिओ/टीव्ही मालिका लेखन यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही इतरांच्या सूचनांप्रमाणे कृती करतात. तुम्ही समाजप्रिय, नाविन्याची आवड असणारे तसेच प्रवासाची आवड असणारे आहात. तुम्ही बुद्धिमान, तल्लख, आणि शास्त्राची आवड असणारे आहात. तुमचा सहवास इतरांना प्रेरणादायक असतो. प्रेम, सहानुभूती आणि आदर या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटतात. तुमच्या बोलण्यात आकर्षकपणा आहे. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. चांगले आणि वाईट यामध्ये तुम्ही उत्तम प्रकारे भेदभाव करू शकतात. तुम्ही कल्पनारम्य आणि उत्साही आहात तसेच ममताळू आणि स्वातंत्र्यप्रिय देखील आहात. तुम्ही सतत कार्य मग्न असतात. तुम्ही विनम्र असून इतरांच्या गुणवैशिष्ट्यांचे कौतुक करतात. तुम्हाला कायद्याचे पालन करणे आवडते. स्वतःच्या वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींकडे तुम्ही आकर्षित होतात. तुम्ही अतिशय हळवे असून फार लवकर मनातून अस्वस्थ होतात. तुम्हाला कोडे सोडवणे, लॉटरी यांचा नाद असतो.


व्यवसाय:-  लेखक, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, राजकीय क्षेत्र, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.


शुभ रत्न:- मोती आणि हिरा.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६. अश्विन कृष्ण चतुर्थी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


आज शुभ दिवस आहे. चंद्र-मंगळ लाभ योगामुळे कामात उत्साह आणि प्रगतीच्या संधी मिळतील. चंद्र-गुरू लाभ योगामुळे अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. चंद्र-शुक्र त्रिकोण योगामुळे कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान लाभण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.


नक्षत्र - रोहिणी / दुपारी १२.१२ नंतर मृग. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ/ (रात्री १०.०७ नंतर ) मिथुन परीघ योग.

*आज संकष्टी चतुर्थी* चंद्रोदय मुंबई - ८.५३, नाशिक - ८

४६.


ग्रहयोग - चंद्र लाभ मंगळ, चंद्र लाभ गुरू, चंद्र त्रिकोण शुक्र.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न करा. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.


वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) चंद्र आपल्या राशीत असल्याने मन प्रसन्न राहील. चंद्र-मंगळ आणि चंद्र-गुरू लाभ योगामुळे कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार अनुकूल राहतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.


मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजनातून फायदा होऊ शकतो. प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाच्या कामात सातत्य ठेवा.


कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) आजचा दिवस समाधानकारक राहील. रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाचे क्षण घालवाल.


सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) नोकरी-व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत अनुकूलता लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळू शकतो. नवीन संधींचा लाभ घ्या.


कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) कामात उत्साह राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहारातून लाभ होण्याची शक्यता आहे. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.


तूळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) आज अनुकूल ग्रहमान राहील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. चंद्र-शुक्र त्रिकोण योगामुळे नातेसंबंधांत गोडवा वाढेल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे.


वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूलता लाभेल. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद चांगला राहील.


धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) भाग्याची साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. प्रवासातून फायदा होऊ शकतो.


मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार अनुकूल राहतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.


कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) नवीन कामे करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक संपर्क वाढतील. नियोजनपूर्वक काम केल्यास यश मिळेल.


मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) दिवस उत्साहवर्धक राहील. कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारातून फायदा होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नवीन योजना आखण्यासाठी अनुकूल वेळ आहे.


– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521

Comments