पर्यटनाला चालना देणारा उपक्रम स्तुत्य - कुलगुरू डॉ. रजनीश कामत

पर्यटनाला चालना देणारा उपक्रम स्तुत्य - कुलगुरू डॉ. रजनीश कामत

*फोटो कॅप्शन : शिवाजी विद्यापीठ येथे शनिवारी मोटारसायकल रॅलीला शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. रजनीश कामत. शेजारी कर्नल विक्रम नलवडे, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष केतन चव्हाण, अश्विन शिंदे, प्रशांत काशीद, डॉ. नचिकेत पाटील आदी.*



कोल्हापूर 31  सिटी न्यूज नेटवर्क 

 पर्यटन वाढीला चालना देणाऱ्या 4x4 कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या उपक्रमाचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी कौतुक केले.

'रेड मड 4x4 ऑफ-रोड चॅलेंज'च्या वतीने आयोजित 'गगनबावडा बाईक राईड २०२६' रॅलीला आज शिवाजी विद्यापीठातून मार्गस्थ करताना ते बोलत होते.



ही रॅली ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान होत असून, ही फक्त एक बाईक राईड नसून १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नेपाळ बाईक एक्सपीडिशनची ट्रायल राईड आहे. या राईडच्या माध्यमातून रायडर्सची बाईक, रायडिंग स्किल्स, टीम को-ऑर्डिनेशन आणि सहनशक्तीची चाचणी होणार आहे.

आज पहाटे पुण्यातून या राईडला सुरुवात झाली. साताऱ्यात अल्पविराम, कोल्हापुरात जेवण व इंधन थांब्यानंतर गगनबावडा घाटातील खरी राईड सुरू झाली. गगनबावड्याच्या हिरव्यागार सह्याद्री आणि भन्नाट निसर्गाचा अनुभव रायडर्स घेत आहेत.

दुसऱ्या दिवशी सनराईज राईड, फोटोग्राफी सेशन आणि गगनबावडा परिसरातील छोटी राईड करून परतीचा प्रवास सुरू होईल. उद्या सकाळी न्यू पॅलेस येथे भेट होऊन सर्वजण परतीच्या प्रवासाला लागतील.

दरम्यान, दसरा चौक येथे रॅलीचे स्वागत भाजपचे कृष्णराज महाडिक यांनी केले.

यावेळी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे प्रशांत काशीद म्हणाले, "पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने ही रॅली आयोजित केली आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या रॅलीचे आयोजन करणार आहोत."

यावेळी अश्विन शिंदे, प्रकाश मुजुमदार, नितीन जोशी, प्रवीण जवळकर, डॉ. नचिकेत पाटील, कर्नल विक्रम नलवडे, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष केतन चव्हाण, विनायक शिंदे, पल्लवी यादव, कुणाल धुम्मा, कृष्णकांत जाधव, दिग्विजय लोळगे यांच्यासह मोठ्या संख्येने मोटारसायकलस्वार उपस्थित होते.

Comments