आजचे राशीभविष्य
शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६.
३१ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत व्यावहारिक असून यश आणि कीर्ती लवकर मिळावी अशी इच्छा असते. तुम्ही सतत उद्योगमग्न असतात. वक्तृत्व उत्तम असते. सर्व गोष्टी झटपट केलेल्या आवडतात. वरिष्ठ कायम तुम्हाला मदत करतात. अनेकदा तुम्ही अनाकलनीय वागतात. भिन्नलिंगी व्यक्तींपासून लाभ होतात. मित्र परिवार फारच छोटा असतो. भांडणे होतात मात्र त्याची फिकीर नसते. आयुष्याचा पूर्वार्ध कष्टप्रद असतो मात्र नंतर सुख आणि सफलता लाभते. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आणि चिकाटी असते. कन्त्यही अडचणींवर तुम्ही मात करतात. प्रकृती सुदृढ आणि विकारवश असते. जीवनात अनेक उलाढाली होतात. स्मरणशक्ती चांगली असते. तुमच्या योजनांमध्ये वारंवार बदल होतात. जीवनात जे मिळवायचे ते शांतपणे मिळवतात. गाजावाजा केलेला आवडत नाही. हर्षलच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात आणि तुमच्या विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. जीवनात बरेच चढउतार येतात. विलक्षण घटना घडतात. तुम्ही अत्यंत उत्साही प्रगतिशील आहात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही तिला तोंड देऊ शकतात. तुम्ही बुद्धिमान, चतुर, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला रूढी, परंपरा फारशा आवडत नाहीत. तसेच खोटेपणा देखील आवडत नाही. तुम्ही समाजप्रिय आहात आणि तुमच्या व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्हाला नवीन नवीन वस्तूंची तसेच प्रवासाची आवड आहे. तुम्ही डोके शांत ठेवून काम केल्यास तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्ही अहंकार टाळला पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा ठामपणा असतो. आयुष्यात तुम्ही सतत बदल करत असतात. तुमचा मित्र परिवार देखील सतत बदलत असतो. हुशार अन बुद्धिमान वर्तुळात वावरणे तुम्हाला आवडते. मनावर घेतल्यास जीवनात अशक्य असे काहीच राहत नाही. वयाच्या चाळीस नंतर भाग्योदय होतो.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, इंटरियर डेकोरेटर, बँकिंग, आयात निर्यात, शास्त्र, तसेच स्पेशालिस्ट डॉक्टर, संशोधन.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.
शुभ रंग:- निळा, पिवळा, नारंगी, राखाडी.
शुभ रत्न:- पोवळे, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६. अश्विन कृष्ण षष्ठी / दुपारी ४.५८ नंतर सप्तमी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
आज चांगला दिवस आहे. चंद्र-बुध त्रिकोण योगामुळे बौद्धिक कामात यश आणि संवादातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. चंद्र-शुक्र केंद्र योगामुळे नातेसंबंधांत अनुकूलता आणि कौटुंबिक आनंद लाभेल. नोकरी-व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक व्यवहारात योग्य नियोजन करा.
नक्षत्र - आर्द्रा / सकाळी ७.१२ नंतर पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.
ग्रहयोग - चंद्र त्रिकोण बुध, चंद्र केंद्र शुक्र.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न यशस्वी होतील.
वृषभ:-(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक व्यवहार अनुकूल राहतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. घरगुती कामे मार्गी लागतील. खर्चाचे नियोजन करा.
मिथुन:-(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) तुमच्या राशीत चंद्र असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. चंद्र-बुध त्रिकोण योगामुळे बौद्धिक कामात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. संवादातून फायदे मिळतील.
कर्क:-(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) कामात अनुकूलता लाभेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. आर्थिक व्यवहारात फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
सिंह:-(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळू शकतो. नवीन कामांचे नियोजन करा.
कन्या:-(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) आज कामात यश मिळवण्यासाठी अनुकूल परिस्थिती राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारातून फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. नवीन संधींचा लाभ घ्या.
तूळ:-(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) चंद्र-शुक्र केंद्र योगामुळे नातेसंबंधांत गोडवा वाढेल. नोकरी-व्यवसायात सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. मित्रमंडळींसोबत आनंदाचे क्षण घालवाल. महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक करा.
वृश्चिक:-(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक बाबतीत अनुकूलता राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. निर्णय घेताना आत्मविश्वास ठेवा.
धनु:-(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) भाग्याची साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे योग आहेत. नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. प्रवासाचे योग संभवतात.
मकर:-(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कामातील अडचणी दूर होण्यास मदत होईल. आर्थिक व्यवहारात फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.
कुंभ:-(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे.
मीन:-(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) दिवस अनुकूल राहील. कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत. चंद्र-शुक्र केंद्र योगामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
8087520521
.jpg)
Comments
Post a Comment