आजचे राशीभविष्य
शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६
१६ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव विनोदी असून तुम्ही मनाने उदार आहात. तुम्ही नम्र, विनयशील असून स्वतःच्या अधिकाराचा रुबाब दाखवत नाहीत. तुम्हाला रहस्यकथा आणि विनोदी सिनेमे आवडतात. स्वभाव शांतताप्रिय असून फार कष्टची कामे आवडत नाहीत. इतरांच्या दुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला चांगली आणि नशीबवान अपत्ये होतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते. वागण्यात सावधगिरी असते. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचे ध्येय अत्यंत उच्च असतात. परंपरागत प्रथांबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा अनुभव घेतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून व्यवहारात त्याचा उपयोग होतो. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला हौस असते. तुम्हाला क्रीडा, प्रवास, संगीत याची आवड असून तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात आणि दुरदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही सर्वसाधारण किंवा तुमच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसांमध्ये मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आवडते. तुम्हाला स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही संशयी असून प्रत्येक गोष्टीची खात्री झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्व नियोजन करतात. तुमच्यामध्ये दुरदर्शीपणा आणि व्यापारी वृत्ती असते. मनाने तुम्ही मोकळे असून तुमच्या कृतीमध्ये मुक्तपणा आहे मात्र तुमचे मन कायम अस्वस्थ असते. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यून जनवत असते. मनात सदैव अस्वस्थता आणि रागीटपणा असतो. वरचेवर विश्रांतीची तुम्हाला गरज भासते.
व्यवसाय:- आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, हिरवा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, पुष्कराज, लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६. अश्विन शुक्ल षष्ठी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
"आज चांगला दिवस आहे"
नक्षत्र - ज्येष्ठ / मूळ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक / सकाळी ६.४८ नंतर धनु.
चंद्र लाभ शुक्र, चंद्र केंद्र नेपच्यून, मंगळ त्रिकोण शनी, शुक्र षडाष्टक हर्षल.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. खर्चाचे नियोजन करा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन ओळखी होतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहारातून फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन संधी चालून येतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
तूळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आजचा दिवस चांगला आहे. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. मात्र अनपेक्षित खर्च होऊ शकतात, त्यामुळे नियोजन करा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) तुमच्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. कामात प्रगती होईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. नवीन संधी मिळतील. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सकाळी ६.४८ नंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचे योग आहेत. नवीन कामे सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक लाभ होऊ शकतात.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) कामातील अडचणी दूर होतील. आर्थिक व्यवहारातून फायदा होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाचे क्षण घालवाल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रांकडून मदत मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) दिवस अनुकूल आहे. अपेक्षित कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
8087520521

Comments
Post a Comment