दुष्काळ सदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड शेतकऱ्यांच्या बांधावर

 दुष्काळ सदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड शेतकऱ्यांच्या बांधावर



कोल्हापूर दि. ७ सिटी न्यूज नेटवर्क 

 दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ . विजय राठोड यांनी शाहूवाडी तालूक्यातील मौजे मोळावडे येथील शेतकरी श्री. रामचंद्र शिवाजी पाटील यांचे  शेतावर भुईमूग  पिकाची  श्री. सयाजी शंकर पाटील यांचे शेतावर रताळी   पिकाची पाहणी केली. मौजे ससेगाव या गावात श्री. गुंगा आनंदा पारळे , श्री.तानाजी महिपती पारळे श्री. केशव गुंडा पारळे  या शेतकऱ्यांच्या शेतावर भात पिकाची पाहणी केली. 



जिल्हाधिकारी यांनी मोळावडे व ससेगावातील उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून सध्य स्थितीतील पीक परिस्थिती संदर्भात चर्चा केली. शेतकऱ्यांची पिके वाळून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या कठीण स्थितीत शासन आपल्या सोबत आहे असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.


     यंत्रणांनी अत्यंत गतीने नुकसानीचे पंचनामे करावेत अशा सूचना देऊन त्यासाठी शेतकऱ्यांनीही त्यांना सहकार्य करावे असा आवाहन केले.  यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी डॉ. समीर शिंगटे, तालुका कृषि अधिकारी मा. निलम चाकणे , मंडळ कृषी अधिकारी संजय तांदळे , अशोक कोळेकर , सदर गावाचे सरपंच , पोलीस पाटील , शेतकरी , सहायक कृषी अधिकारी, तलाठी आदि. उपस्थित होते .

Comments