फुलेवाडी रिंग रोड येथे भक्तिमय वातावरणात कुंकुमार्चन सोहळा उत्साहात संपन्न

 

फुलेवाडी रिंग रोड येथे भक्तिमय वातावरणात कुंकुमार्चन सोहळा उत्साहात संपन्न



नऊ दुर्गास्वरूप कन्यांचे पूजन; शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख यांच्या हस्ते देवीची महाआरती

कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क 

श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटी, फुलेवाडी रिंग रोड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात परिसरातील माता-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भक्तिमय वातावरणात हा सोहळा उत्साहात पार पडला.



विनायक जोशी गुरुजी यांच्या उपस्थितीत विधिवत कुंकुमअर्चन सोहळा संपन्न झाला. यावेळी नऊ दुर्गास्वरूप कन्यांचे पूजन करून स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.


कुंकुमार्चन सोहळ्यानंतर शिवसेना गटनेते माननीय शारंगधर देशमुख यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी जयदीप पाटील, संजय वनकुंद्रे, राजू भोसले, राहुल पाटील आणि नारायण मिरजे यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शारदा पाटील आई, वैशाली किरण पाटील, सुनीता मिरजे, राणी पोवाळकर, रेशमा रामपुरे, जयश्री भाट, दीपाली चांदम, माधुरी कारदग, अमृता हिरेमठ, पियुष वनकुंद्रे, प्रथमेश पाटील आणि रोहन कारदगे यांनी विशेष नियोजन व परिश्रम घेतले.

Comments