दसरा महोत्सव बुद्धिबळ स्पर्धेत विद्यापीठ हायस्कूलचा प्रथम क्रमांकाने गौरव

 

दसरा महोत्सव बुद्धिबळ स्पर्धेत विद्यापीठ हायस्कूलचा प्रथम क्रमांकाने गौरव



कोल्हापूर 20  सिटी न्यूज नेटवर्क 

स्व. डी. डी. शिंदे सरकार स्पोर्ट्स, विद्यापीठ हायस्कूल तसेच अनुज् चेस ॲकॅडमी आणि इचलकरंजी चेस ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दसरा महोत्सव बुद्धिबळ स्पर्धेत विद्यापीठ हायस्कूलने फर्स्ट रँक बेस्ट स्कूल हा मान पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचा गौरव करण्यात आला.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यापीठ हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या मंचावर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या बुद्धिबळातील कौशल्याचे आणि मेहनतीचे कौतुक करण्यात आले.

या प्रसंगी विद्यापीठ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. व्ही. रणवरे, उपमुख्याध्यापक एम. व्ही. कुंभार, पर्यवेक्षिका एन. ए. ढगे, जिमखाना प्रमुख ए. डी. चव्हाण, क्रीडाशिक्षक आर. व्ही. रोकडे तसेच बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बुद्धिबळ असोसिएशनचे माजी सचिव माननीय श्री. कृष्णात पाटील सर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

विद्यापीठ हायस्कूलने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि शाळेचे अभिनंदन करण्यात आले.


Comments