लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित
![]() |
| उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. संजय दुधाणे, शेजारी. उल्हास पवार, आबा बागुल , डॉ. नीलम गोऱ्हे, जयश्री बागुल, हेमंत बागुल |
पुणे १३ सिटी न्यूज नेटवर्क
पुणे नवरात्रौ महोत्सवानिमित्त प्रतिष्ठेच्या लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्काराने लेखक प्रा. संजय दुधाणे यांचा गौरव करण्यात आला. क्रीडा लेखन व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दुधाणे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे क्रीडा क्षेत्रासाठी डॉ. संजय दुधाणे, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. ऋतुपर्ण शिंदे, सामाजिक क्षेत्रासाठी डॉ. विजय फळणीकर, सांस्कृतिक क्षेत्रासाठी निकिता मोघे आणि लोककलेसाठी वैशाली समसापूरकर यांना उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरवित करण्यात आले. शाल, मानपत्र, स्मृतीचिन्ह, लक्ष्मीमातेची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, माजी, उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, माजीमंत्री बाळासाहेब शिवरकर, आयोजक आबा बागुल, जयश्री बागुल, युवासेना पुणे शहराध्यक्ष हेमंत बागुल, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढील वर्षापासून पुणे नवरात्रौ महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा असे सूचना नामदार उदय सावंत यांनी केली. प्रास्ताविकात आबा बागुल यांनी सांगितले की, या महोत्सवातील पुरस्कराचे मानकऱ्यांना पुढे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होतात असा आमचा अनुभव आहे. पुरस्कार्थी संजय दुधाणे यांनी आबा बागुल यांच्या कार्याचे कौतुक केले. दुधाणे आपल्या मनोगतात म्हणाले की, पुणे तसे पाच मानाची गणपती आहे. तसेच पुण्यातील पहिल्या पाच पुरस्कारमध्ये मानांकित असलेला हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार दुर्लक्षित मराठी लेखकांना मी अर्पित करीत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले, तर घनश्याम सावंत यांनी आभार मानले.
क्रीडा क्षेत्राला पहिला मान
लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्काराने पुण्यातील ५ मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार प्रा. संजय दुधाणे यांना प्रदान करण्यात आला. मानपत्रात दुधाणे यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकारिता व क्रीडा लेखनाच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. 'ऑलिम्पीक वीर खाशाबा जाधव' आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्यावर मराठीसह इंग्रजीत लिहिलेली पुस्तकं मात्र प्रेरणादायी असल्याही उल्लेख मानपत्रात करण्यात आला आहे.
.

Comments
Post a Comment