मन चाहे गीत’ बहारदार कराओके ट्रॅक शो ७ ऑक्टोबरला
कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क
संगीतप्रेमींसाठी सुरभी कराओके सिंगिंग अकॅडमी प्रस्तुत ‘मन चाहे गीत’ या बहारदार कराओके ट्रॅक शोचे आयोजन बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, नूतनीकृत मेन हॉल (वातानुकूलित), कोल्हापूर येथे होणार आहे.
‘Music in my Heart beat’ या संकल्पनेवर आधारित या संगीत मैफलीत विविध गायक कलाकार आपल्या सुमधुर आवाजातून लोकप्रिय गीतांची मैफल सादर करणार आहेत.
कार्यक्रमात मनोज सराफ, मुकुंद मोकाशी, संदीप पाटील, राजेंद्र वेल्हाळ, किरण कुलकर्णी, रामचंद्र उमके, के. टी. शिंदे, बाजीराव मुरसे, संग्राम साळोखे, संजय दिपकर, श्रीनिवास कुलकर्णी, सुचिता सावंत, संध्या बारगावे, मीना सरदेशाई, गौरी संकपाळ, सरोज पाटील, सुजाता लोहार, नयना पाटील, मुग्धा कुलकर्णी आणि रुपाली देशपांडे यांच्यासह अनेक गायक कलाकार सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे निवेदन...पूर्णा इव्हेन्ट्स अॕड हॅपी मोमेंन्ट्स च्या सर्वेसर्वा सौ.मंगल नियोगी करणार असून, कार्यक्रमाची संकल्पना अरविंद कस्तुरे (सर) यांची आहे. पूर्णा इव्हेंट्स अँड हॅप्पी मोमेंट्स यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
संगीतप्रेमींना लोकप्रिय गीतांचा आनंद घेण्याची अनोखी संधी या कार्यक्रमातून मिळणार असून, कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बहारदार संगीत मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Comments
Post a Comment