आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६. 




अश्विन शुक्ल नवमी / दुपारी १२.५१ नंतर दशमी. शरद ऋतू. पराभव नाम संवत्सर, शके १९४८.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०.


आज उत्तम दिवस आहे. चंद्र प्रतियुती मंगळ आणि गुरू तसेच चंद्र केंद्र बुध या ग्रहयोगांमुळे काही कामांमध्ये अनपेक्षित घडामोडी घडू शकतात. महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचलावीत. नक्षत्र - श्रवण. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर. शूल योग.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.



मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज कामात काही अडथळे येऊ शकतात. संयमाने परिस्थिती हाताळा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. वरिष्ठांशी बोलताना शब्द जपून वापरा.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) दिवस अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) कामाचा ताण जाणवू शकतो. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करा. आर्थिक बाबतीत घाईघाईने निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) मनातील इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्नांना गती मिळेल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीमुळे नवीन संधी मिळू शकतात.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) नियोजनपूर्वक काम केल्यास अपेक्षित यश मिळेल. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहा.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाच्या ठिकाणी काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. संयम आणि समजूतदारपणा ठेवा. आर्थिक बाबतीत सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) दिवस उत्साहवर्धक आहे. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवा. प्रवासाचे योग संभवतात.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) चंद्र आपल्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कामात प्रगती होईल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. मात्र, चंद्र-मंगळ आणि चंद्र-गुरू प्रतियुतीमुळे रागावर नियंत्रण ठेवा.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कामात अडथळे आल्यास निराश होऊ नका. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) मित्रांकडून सहकार्य मिळेल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक लाभाचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.


– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments