पायोनियर चषक बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात प्रारंभ अभय,अरिन, वरद विहान व वेदांत आघाडीवर

 पायोनियर चषक बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात प्रारंभ अभय,अरिन, वरद विहान व वेदांत  आघाडीवर

कॅप्टन उत्तम पाटील व महेश कुलकर्णी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून पायोनियर चषक बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डावीकडून स्नेहा कुलकर्णी, आरती मोदी, धिरज वैद्य, भरत चौगुले, नितीन कुलकर्णी, अमेय देऊसकर, सुरज कुलकर्णी व मनिष मारुलकर


 कोल्हापूर रविवार दिनांक 18 ऑक्टोंबर :- महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, साईक्स एक्सटेंशन, कोल्हापूर येथे अनयाज् चेस क्लब ने  कै. मंगेशराव कुलकर्णी स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या पायोनियर चषक अकरा व सतरा वर्षाखालील शालेय मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या.

 2006 पासून दरवर्षी होत असलेल्या या स्पर्धा जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात होत आहेत. अकरा व सतरा वर्षाखालील दोन्ही गटात स्वतंत्रपणे या स्पर्धा घेतल्या जात आहेत. पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग व स्थानिक इचलकरंजी, जयसिंगपूर, वारणानगर, गडहिंग्लज व  कोल्हापूर येथील नामवंत 96 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यापैकी 29 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत. 

 या स्पर्धेचे उद्घाटन युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेसचे कॅप्टन उत्तम पाटील व पायोनियर एनर्जीचे महेश कुलकर्णी यांचे हस्ते बुद्धिबळाच्या पटावर  प्रतिकात्मक चाल करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर नितीन कुलकर्णी, अमेय देऊसकर, सुरज कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, स्पर्धा समन्वयक मनिष मारुलकर,धीरज वैद्य, आरती मोदी, प्रशांत पिसे व सचिन वनीरे उपस्थित होते मुग्धा गोरे-लिंगनूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

 आज झालेल्या चौथ्या फेरीनंतर अकरा वर्षाखालील गटात अग्रमानांकित सांगलीचा वरद पाटील, द्वितीय मानांकित पुण्याचा विहान शहा व पाचवा मानांकित पुण्याचा वेदांत कुलकर्णी हे तिघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.सांगलीचा आरव पाटील साडेतीन गुणासह द्वितीय स्थानावर आहे.

सतरा वर्षाखालील गटात अग्रमानांकित जांभळी चा अभय भोसले व तृतीय मानांकित कोल्हापूरचा अरिन कुलकर्णी हे दोघेजण चार गुणांचे संयुक्तपणे आघाडीवर आहेत. तृतीय मानांकित कोल्हापूरचा व्यंकटेश खाडे पाटील साडेतीन गुणासह द्वितीय स्थानावर आहे.

Comments