गोकुळसाठी आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी समविचारी पॅनल जाहीर

 गोकुळसाठी आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी समविचारी पॅनल जाहीर 



पॅनल विजयी झाल्यास शशिकांत पाटील-चुयेकर हेच गोकुळचे अध्यक्ष : आमदार सतेज पाटील


कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे पॅनल जाहीर करण्यात आले आहे. या पॅनलमध्ये सात विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. 

पॅनलची घोषणा करताना आमदार सतेज पाटील यांनी समविचारी आघाडीचे पॅनल विजयी झाल्यास शशिकांत पाटील-चुयेकर हेच गोकुळचे अध्यक्ष असतील, अशी स्पष्ट घोषणा केली.


गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या पॅनलविरोधात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे पॅनल मैदानात उतरले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही आघाड्यांमध्ये थेट लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 


समविचारी आघाडीच्या पॅनलमध्ये शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील, किसन चौगले आणि अंजना रेडेकर यांसह माजी संचालकांना पुन्हा एकदा संधी मिळाली तर राहुल देसाई, बाबासाहेब देवकर, उदय पाटील , विश्वजित जाधव, विद्याधर गुरुवे, सचिन घोरपडे सत्यजित पाटील रणधीर मोरे विश्वजीत पाटील,  भीमगोंडा बोरगावे , विशाल पाटील,  विश्वासराव इंगवले दादासाहेब पाटील, विकास पाटील सुभाष डोंगरे शहाजी पाटील भाग्यश्री डोंगळे शशिकांत खोत राजू आवळे आदी २५ जणाचा पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला.


गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ठरावधारकांच्या भेटीगाठी घेत प्रचाराची रणनीती आखली आहे. दूध उत्पादकांच्या हिताचे मुद्दे आणि गोकुळच्या कारभारावरून दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. 


आता समविचारी आघाडीचे अधिकृत पॅनल जाहीर झाल्याने गोकुळच्या निवडणुकीतील राजकीय चित्र आणखी स्पष्ट झाले असून, या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments