आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६.




 १८ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे.  तुम्ही सभ्य, सुसंस्कृत आणि मोठ्या मनाचे आहात. तुम्ही मित्रणाशी प्रामाणिक असतात. तुम्ही एक विश्वासू आणि जबाबदार नागरिक असतात. वक्तृत्व, हरहुन्नरी स्वभाव, स्वातंत्रपणा, मान सन्मान ही तुमची वैशिष्टये आहेत. तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार, कार्यक्षम आणि लढावृ वृत्तीचे आहात. इतरांची कुरापत काढणे तुम्हाला आवडते. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून स्वतःच्या विषयाची तुम्हाला पूर्ण माहिती असते. तसेच स्वकर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतात. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. तुम्ही संभाषणचतुर असतात. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतात. सहसा तुम्ही स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळांची आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. दुर्बल लोकांना वर दया करण्यात तुम्हाला एक सुप्त आनंद मिळतो. आजारी लोकांना बरे करण्याची तुमच्यामध्ये शक्ती असते. तुम्ही तापट असला तरी शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही स्वतःवर ताबा ठेवू शकतात. तुमचे विचार तुम्ही ठामपणे मांडतात आणि तुमच्या मध्ये धैर्य असते. तुम्हाला प्राणी प्रिय असतात आणि कायद्याचे पालन करणे आवडते. तुम्ही अत्यंत विश्वासू आणि जबाबदारीच्या जागा सांभाळू शकतात. तुमची मानसिक शक्ती अफाट आहे. प्रवासामुळे तुमचा दृष्टिकोन विशाल होतो. तुम्ही विचारवंत आणि अभ्यास वृत्तीचे आहात. तुमचे विचार काळाच्या पुढे असतात. त्यामुळे इतर लोक तुमचा सल्ला घेतात. तुमच्या आवडी निवडी बाबत तुम्ही अत्यंत ठाम असतात. तुम्ही अहंकार टाळला पाहिजे. तुम्ही सतत एक विद्यार्थी असतात. जीवनात खरा आनंद शिकण्यात आणि शिकवण्यात आहे असे तुम्हाला ठामपणे वाटते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळते.



व्यवसाय:-  हॉटेल, बेकरी, संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृह सजावट, लोखंडाशी संबंधित व्यवसाय, इंजिनिअर, बांधकाम क्षेत्र मिल्ट्री, पोलीस, गुप्तहेर.


शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- तांबडा, पांढरा, पिवळा.


शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


रविवार, १८ ऑक्टोबर २०२६. अश्विन शुक्ल सप्तमी / सकाळी ८.२९ नंतर अष्टमी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.



राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे"


नक्षत्र - पूर्वाषाढा / दुपारी १२.४९ नंतर उत्तराषाढा. राशी - धनु / संध्याकाळी ७.३३ नंतर मकर.


रवी केंद्र चंद्र, चंद्र लाभ बुध.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सकाळचा काळ अनुकूल आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सकाळनंतर महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक व्यवहारातून लाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. खर्चाचे नियोजन करा आणि घाईघाईने निर्णय घेऊ नका.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) नवीन ओळखी होतील. बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. प्रवासाचे योग आहेत. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. महत्त्वाच्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) कौटुंबिक बाबतीत आनंदाचे वातावरण राहील. घरगुती कामात वेळ जाईल. आर्थिक व्यवहार जपून करा. महत्त्वाची कामे करताना संयम ठेवा.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) दिवस संमिश्र आहे. कामात काही अडथळे येऊ शकतात. नोकरी-व्यवसायात संयमाने काम करा. आर्थिक लाभाची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कामात प्रगती होईल. नवीन संधी उपलब्ध होतील. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.


तूळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य मिळेल. मात्र खर्चाचे प्रमाण वाढू शकते.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न यशस्वी होतील. बोलताना संयम ठेवा आणि गैरसमज टाळा.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. सकाळचा काळ अनुकूल आहे. नवीन कामात प्रगती होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. संध्याकाळनंतर निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) संध्याकाळी ७.३३ नंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. कामात काही नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक व्यवहारात नियोजन करा. कौटुंबिक जबाबदाऱ्या शांतपणे पार पाडा.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) दिवस अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) कामात यश मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन संधींचा फायदा घेता येईल. मात्र आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

8087520521.

Comments