शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी मी कटिबद्ध आहे - शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे

 शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी मी कटिबद्ध आहे - शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे



कोल्हापुरातील शैक्षणिक संस्थांच्या सदिच्छा भेटींमधून कौस्तुभ गावडे यांचा शिक्षकांशी संवाद


कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क 

 पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी कोल्हापूर शहरातील विविध शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी देत प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधला. या भेटींच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती, शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपाययोजना आणि भविष्यातील आव्हाने यांवर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी कौस्तुभ गावडे यांनी

शिक्षक, प्राचार्य व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधत शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. 


कोल्हापूर मधील प्रचार दौऱ्यात महावीर महाविद्यालय (स्वायत्त), नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांना भेट देण्यात आली. प्रत्येक ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपुलकीने स्वागत करत विविध विषयांवर संवाद साधला.


महावीर महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. ए. डी. जोशी, दादासाहेब मगदूम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. बसवराज वस्त्रद आणि कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. गोमटेश पाटील यांच्यासह शिक्षक व प्राध्यापकवृंद उपस्थित होते. नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दि मोहमेडन एज्युकेशन सोसायटीचे तसेच मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन मा. श्री. गनी आजरेकर, स्कूल कमिटीचे चेअरमन मा. श्री. रफीक शेख आणि मुख्याध्यापक काजे सर यांच्याशी शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा झाली. गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज येथे चेअरमन डॉ. मंजिरी अजित मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिलचे मा. श्री. दौलत देसाई, सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य वाय. डी. पाटील, प्रा. पी. बी. झावरे आणि प्रा. आनंद मेणसे यांची उपस्थिती होती. यावेळी शिक्षकांच्या प्रश्नांना सक्षम व्यासपीठ मिळवून देणे आणि शैक्षणिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांबाबत चर्चा करण्यात आली.

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, डॉ. अनिल मालगुडे, डॉ. के. एन. देसाई आणि NAAC समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कौस्तुभ गावडे यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान शिक्षक बांधवांनी व्यक्त केलेला सकारात्मक प्रतिसाद आणि विश्वास महत्त्वाचा आहे. 


शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, त्यांचे प्रश्न समजून घेणे, त्यांच्या अडचणींना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी समन्वय साधणे आवश्यक असल्याची भूमिका या संवादातून अधोरेखित झाली. शिक्षकांचे प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता त्यावर प्रभावी पाठपुरावा व्हावा, अशी अपेक्षाही या भेटींच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आली.


शिक्षकांचा सन्मान, त्यांच्या प्रश्नांची जाण आणि शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संवाद व समन्वय, या मुद्द्यांवर केंद्रित असलेल्या या सदिच्छा भेटींमधून शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. शिक्षकांच्या अपेक्षा जाणून घेत त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला.

Comments