JITO कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी राजीव परिख; सचिवपदी रविंद्र देवमारे

 JITO कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी राजीव परिख; सचिवपदी रविंद्र देवमारे



२७ ऑक्टोबरला नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा; जैन समाजातील गुणवंतांचा होणार गौरव


कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क 

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) कोल्हापूर चॅप्टरच्या सन २०२६-२८ या कालावधीसाठी अध्यक्षपदी राजीव चिनुभाई परिख, तर चीफ सेक्रेटरीपदी रविंद्र देवमारे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण व शपथग्रहण सोहळा मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे होणार आहे.


या सोहळ्यास JITO Apex चे संजयजी डांगी व प्रमोदजी घोरडिया, JITO महाराष्ट्राचे अध्यक्ष रविंद्रजी खिंवसरा, JITO Apex चे माजी अध्यक्ष विजयजी भंडारी, सुजितजी भटेवरा, अनिलजी ललवाणी तसेच प्रसिद्ध उद्योजक संजयजी घोडावत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


नूतन व्यवस्थापन समितीची निवड


JITO कोल्हापूर चॅप्टरच्या नूतन व्यवस्थापन समितीमध्ये चेअरमन म्हणून दिलीप ओसवाल व हर्षद दलाल, सेक्रेटरी म्हणून जयकुमार परिख व दिलीप ओसवाल, ट्रेझरर म्हणून प्रतीक ओसवाल, तर जॉइंट ट्रेझरर म्हणून चंद्रकांत ओसवाल यांची निवड झाली आहे. व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून अतुल शाह यांचा समावेश आहे.


याशिवाय, यूथ विंगच्या चेअरमनपदी पुनीत कोठारी, तर लेडीज विंगच्या चेअरपर्सनपदी स्वीटी पोरवाल यांची निवड करण्यात आली आहे.


जैन समाजातील गुणवंतांचा होणार गौरव


मावळते अध्यक्ष रवी संघवी व चीफ सेक्रेटरी अनिल पाटील यांनी मागील दोन वर्षांत JITO कोल्हापूर चॅप्टरच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्याचा गौरव करून नूतन कार्यकारिणीकडे नेतृत्वाची सूत्रे सोपविण्यात येणार आहेत.


या कार्यक्रमात जैन समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये जिटो जीवन गौरव पुरस्कारासाठी नेमचंदजी संघवी, जिटो सामाजिक कार्य पुरस्कारासाठी संजय शेटे, जिटो यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी जयकुमार परिख आणि जिटो नवउद्योजक पुरस्कारासाठी उत्पल शाह यांची निवड करण्यात आली आहे.


जैन समाजाच्या सामाजिक, व्यावसायिक व शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या JITO संस्थेच्या या कार्यक्रमाला कोल्हापूरमधील सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Comments