आजचे राशीभविष्य
सोमवार, २ नोव्हेंबर २०२६.
२ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सहजपणे चांगले आणि वाईट यात फरक करू शकतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल दया वाटते. तुम्ही तुमचे विचार ठामपणे मांडतात. मित्रांबद्दल तुम्हाला प्रेम असून तुम्ही त्यांच्या बाजूने लढण्यास तयार होतात. तुम्हाला लांबच्या प्रवासाची आवड आहे. तुम्ही कायदप्रेमी आहात. इतरांना तुम्ही सहज आकर्षित करू शकतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे आणि तुम्हाला नवनवीन कल्पना सुचत असतात. वयाच्या २९ नंतर तुमचा उत्कर्ष होतो. तुमच्या कौटुंबिक जीवनात बरेच चढउतार होतात. तुमच्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित होतात. तुम्हाला मानसन्मान यांची आवड आहे. तुम्ही इतरांच्या सूचनेप्रमाणे कृती करतात. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. अनेकदा तुमची चूक तुमच्या लक्षात येते पण तुम्ही ती मान्य करत नाहीत.
व्यवसाय:- लेखन, राजकीय नेता, डॉक्टर, केमिस्ट, इंजिनिअर, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, संगीतकार, कथालेखक.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- किरमिजी, पांढरा आणि निळा.
शुभ रत्न:- मोती, पोवळे आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
सोमवार, २ नोव्हेंबर २०२६. अश्विन कृष्ण अष्टमी / दुपारी १.११ नंतर नवमी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. संपर्क - 8087520521
चंद्र नक्षत्र - आश्लेषा.
आजचा दिवस - चांगला दिवस आहे.
ग्रहयोग - चंद्र युती मंगळ, चंद्र केंद्र बुध, चंद्र युती गुरू, चंद्र लाभ शुक्र.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. मालमत्तेच्या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. नोकरीत अनुकूलता लाभेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग येतील. तुमच्या पराक्रमात आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. नवीन लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) आर्थिक बाजू भक्कम राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या बोलण्यातील माधुर्यामुळे अवघड कामेही सोपी होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास दुणावेल. आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामांमध्ये अपेक्षित यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अचानक प्रवासाचे योग येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी थोडी धावपळ वाढेल. आरोग्याची आणि आहाराची पथ्ये पाळा.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे.
तूळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरी-व्यवसायात मोठी प्रगती होईल. वरिष्ठांची मर्जी राहील आणि तुमच्या कामाचे विशेष कौतुक होईल. पितृपक्षाकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होईल. दूरच्या प्रवासातून आनंद मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कामात आणि प्रवासात सावधगिरी बाळगा. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहावे.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होऊ शकतो. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. महत्त्वाचे करार करण्यासाठी योग्य दिवस.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) विरोधकांवर आणि अडचणींवर सहज मात कराल. नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. आरोग्याशी संबंधित तक्रारी दूर होतील. आर्थिक व्यवहार यशस्वी ठरतील.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) बौद्धिक आणि कलात्मक कामात विशेष यश मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. नवीन कल्पना अमलात आणाल.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
.jpg)
Comments
Post a Comment