आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६.



 अश्विन कृष्ण नवमी / सकाळी ११.५५ नंतर दशमी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. संपर्क - 8087520521


आज चांगला दिवस आहे. चंद्र केंद्र हर्षल योगामुळे कामात नवीन विचार आणि अनपेक्षित संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील. नवीन कामे सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण राहील. मात्र, निर्णय घेताना घाई न करता योग्य नियोजन करावे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगल्यास दिवस अधिक चांगला जाईल.


नक्षत्र - मघा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.



मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. नवीन कामे करण्यासाठी उत्साह राहील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.


वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.


मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती करता येईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात योग्य नियोजन करणे फायदेशीर ठरेल.


कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) रखडलेली कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत अनुकूलता राहील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.


सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) आपल्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. चंद्र केंद्र हर्षल योगामुळे अनपेक्षित संधी मिळू शकतात. महत्त्वाच्या निर्णयात विचारपूर्वक पावले उचला.


कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. शांतपणे काम केल्यास अपेक्षित यश मिळेल.


तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल दिवस आहे.


वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) कामाच्या ठिकाणी आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल.


धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) भाग्याची साथ मिळाल्याने कामात प्रगती होईल. नवीन संधींचा लाभ घेता येईल. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक बाबतीत अनुकूलता राहील.


मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी संयमाने वागणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.


कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) नोकरी-व्यवसायात अनुकूल घडामोडी होतील. भागीदारीच्या कामात फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.


मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) कामाचा व्याप वाढू शकतो. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत नियोजन करणे आवश्यक आहे. आरोग्याकडे आणि विश्रांतीकडे लक्ष द्या.


– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments