आजचे राशीभविष्य
रविवार, ८ नोव्हेंबर २०२६
८ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शनी आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही संमिश्र गुणांचे आहात. शांतता आणि एकांत तुम्हाला आवडतो. शास्त्रीय संगीताची आवड असते. शिस्त, टापटीप, नियमितपणा आवडतो. जीवनाचा खोलवर विचार करून भविष्याचे निर्णय विचारपूर्वक घेतात. तुम्ही धोरणी आणि मुत्सद्दी आहात. धाडसी, आक्रमक आणि तत्पर आहात. तुमचाउद्देश चांगला असतो मात्र मुद्देसूद बोलता येत नाही. खेळांची आणि व्यायामाची आवड असते. तुम्ही समतोल विचारांचे, कडक शिस्तीचे, निश्चयी, कर्तव्यतत्पर आणि कार्यक्षम आहात. तुम्ही संशयी असू शकतात आणि तुमच्या बाबत बरेच गैरसमज असतात. मनातून एकटे असतात. मैत्रीला जगणारे आहात मात्र स्वभाव तापट आहे. जीवनात अडचणी आणि विलंब याचा अनुभव येतो. इतरांना वेळेला मदत केली तरी तुमच्या वेळी इतर लोक येत नाहीत त्यामुळे कधीकधी जीवनात नैराश्य येते.
व्यवसाय:- इंजिनिअर, राजकारण, लाकूड, कोळसा, भौतिक शास्त्र, गणित, संशोधन, लेखन, रेल्वे, परिवहन.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:- राखाडी, काळा, निळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
रविवार, ८ नोव्हेंबर २०२६. अश्विन कृष्ण चतुर्दशी / सकाळी ११.२८ नंतर अमावस्या. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. संपर्क - 8087520521
आज आनंदी दिवस आहे. चंद्र युती बुध योगामुळे बौद्धिक कामे, व्यवहार आणि संवादासाठी अनुकूल वातावरण राहील. नवीन कल्पना सुचतील आणि महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. बोलताना स्पष्टता आणि व्यवहारात योग्य नियोजन ठेवल्यास दिवस अधिक समाधानकारक राहील.
नक्षत्र - स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तूळ.
आज *नरक चतुर्दशी* (सूर्योदय ६.४३) असून अभ्यंगस्नानाचे महत्त्व आहे.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) आजचा दिवस आनंददायी राहील. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
वृषभ:-(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वस्तूंच्या खरेदीचे योग आहेत. कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाचे क्षण घालवाल.
मिथुन:-(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) चंद्र युती बुध योगामुळे बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन कल्पना सुचतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे.
कर्क:-(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक नियोजनासाठी चांगला दिवस आहे. नोकरी-व्यवसायात सहकार्य लाभेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती राहील.
सिंह:-(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
कन्या:-(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) आर्थिक बाबतीत अनुकूलता राहील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
तूळ:-(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) आपल्या राशीत चंद्र असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. चंद्र युती बुध योगामुळे संवादकौशल्याचा चांगला उपयोग होईल. नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
वृश्चिक:-(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक व्यवहारात लाभ होऊ शकतो. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल.
धनु:-(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रवासाचे बेत आखाल. नवीन कामांचे नियोजन करण्यासाठी दिवस चांगला आहे.
मकर:-(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कुंभ:-(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) भाग्याची साथ मिळेल. नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवतात.
मीन:-(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) आर्थिक बाबतीत अनुकूलता राहील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
.jpg)
Comments
Post a Comment