आजचे राशीभविष्य
बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६.
कार्तिक शुक्ल नवमी. वृद्धी तिथी, कुशमांड नवमी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
चंद्र नक्षत्र - शततारका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ.
आजचा दिवस - आनंदी आणि उत्साहवर्धक दिवस आहे. चंद्र त्रिकोण बुध योगामुळे बुद्धिमत्ता, विचारशक्ती आणि निर्णयक्षमता वाढेल. नवीन कल्पना सुचतील. महत्त्वाच्या चर्चा, बैठका, लेखन, व्यवहार आणि संपर्कासाठी दिवस अनुकूल आहे. चंद्र केंद्र हर्षल योगामुळे काही अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे. अचानक बदलांना सामोरे जाताना संयम राखणे आवश्यक आहे. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या.
ग्रहयोग - चंद्र त्रिकोण बुध, चंद्र केंद्र हर्षल.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यश मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी होतील. कामात बुद्धिमत्तेचा चांगला उपयोग होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. लांबच्या प्रवासाचे योग येतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अचानक काही अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलणे हिताचे ठरेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. नवीन करार करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) नोकरी-व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका.
तूळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) बौद्धिक आणि कलात्मक क्षेत्रात चांगले यश मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. घरातील प्रलंबित कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्या पराक्रमात आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या चर्चा आणि बैठकीत यश मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) आर्थिक परिस्थिती सुधारेल. वाणीतील प्रभावामुळे महत्त्वाची कामे सोपी होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र त्रिकोण बुध योगामुळे बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता वाढेल. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परदेशाशी संबंधित कामात अनुकूलता राहील. आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. मनातील काही चिंता दूर होतील. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. आरोग्याची काळजी घ्या.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
.jpg)
Comments
Post a Comment