₹१० हजारांचा एकदाच रिचार्ज, तीन वर्षे रिचार्जची चिंता नाही; जिओचा नवा प्लॅन

 ₹१० हजारांचा एकदाच रिचार्ज, तीन वर्षे रिचार्जची चिंता नाही; जिओचा नवा प्लॅन



• दररोज २.५ जीबी हाय-स्पीड ५जी डेटा


• जिओहॉटस्टार, कॅनव्हा प्रो लाइट आणि ५० जीबी क्लाउड स्टोरेजसारखे अतिरिक्त फायदे


• ७ नोव्हेंबरपासून नवा प्लॅन उपलब्ध; तीन वर्षे किंमत आणि सुविधा कायम राहणार


मुंबई, ६ सिटी न्यूज नेटवर्क 

रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी १० हजार रुपयांचा तीन वर्षांच्या वैधतेचा नवा अनलिमिटेड प्लॅन सादर केला आहे. एकदाच रिचार्ज केल्यानंतर पुढील तीन वर्षे पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. दूरसंचार क्षेत्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्लॅन असल्याचा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे, पुढील तीन वर्षे या प्लॅनची किंमत आणि त्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व सुविधा कायम राहणार आहेत.


या प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज २.५ जीबी हाय-स्पीड डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता पूर्ण तीन वर्षे असेल.


कॉलिंग आणि डेटासोबतच ग्राहकांना जिओहॉटस्टार मोबाईलवरून हॉलिवूडमधील मनोरंजनपर आशय पाहता येणार आहे. यामध्ये थेट क्रीडा प्रक्षेपण, हॉटस्टार ओरिजिनल्स आणि मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. याशिवाय, १२ महिन्यांचे कॅनव्हा प्रो लाइट सबस्क्रिप्शन आणि फाइल्स, फोटो व कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी जिओएआयक्लाउडवर ५० जीबी मोफत स्टोरेजही मिळणार आहे.


जिओचा हा नवा प्लॅन ७ नोव्हेंबर २०२६ पासून उपलब्ध होणार आहे. ग्राहक मायजिओ ॲप, जिओची वेबसाइट, जिओ स्टोअर्स, रिटेल आउटलेट्स आणि जिओच्या अन्य रिचार्ज माध्यमांद्वारे या प्लॅनचा लाभ घेऊ शकतील.

Comments