आजचे राशीभविष्य
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६.
२१ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये आणि आजचे सगळ्यांचे राशिभविष्य :-
तुमच्यावर मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ असून तुमच्या मुलांवर तुमचे विशेष प्रेम असते. उच्च पडला जाण्याची महत्वाकांक्षा असते. उत्साह दांडगा असतो. तुमचे जीवन सुखासीन असते अन भिन्न लिंगी व्यक्तींकडे तुमचा ओढ असतो. इतरांचे किरकोळ दोष सुद्धा तुम्ही सहज काढू शकतात. तुम्हाला अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून आयुष्यात सतत पुढे जाण्याचा विचार करत असतात. तुमच्याकडे ज्ञान आहे मात्र त्याचा अहंकार टाळला पाहिजे. तुमचा कर्मकांडावर विश्वास नसतो. तुम्ही नेहमी योग्य व्यक्तीला मदत करतात. तुम्ही न्याय प्रेमी असून तुम्हाला शुद्ध प्रेमाची आवड आहे. इतरांच्या प्रगतीसाठी तुम्ही कष्ट करतात आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करतात. तुम्ही उत्साही आणि क्रियाशील आहात परंतु शीघ्रकोपी आहात. इतरांवर तुम्ही वर्चस्व गाजवतात. एखाद्या मोठ्या कारखान्याचे तुम्ही उत्कृष्टपणे संचालन करू शकतात. तुमचा स्वतंत्र बाणा आहे आणि तुमची जबाबदारी तुम्ही चोख पार पाडतात. तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वतःचे डोके शांत ठेवल्यास कोणतीही गोष्ट मिळवणे तुम्हाला अशक्य नाही. तुम्ही दयावान आणि नीतिमान आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यामध्ये पुरेपूर आत्मविश्वास आहे. तुम्ही व्यवस्थित आणि दिमाखदार आहात. तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा मोकळेपणा असतो. तुम्हाला अनेक खेळांची आवड असते. तुम्हाला उत्तम विनोद बुद्धी लाभलेली आहे. तुम्ही हट्टीपणा आणि अहंकार टाळला पाहिजे. भविष्यात घडणाऱ्या घटनांची तुम्हाला आधीच जाणीव होते. तुम्ही अतिसंवेदनशील आहात त्यामुळे तुमचे वागणे एकांती आणि गूढ असते. प्रवासाची आवड असते. तुमच्या भोवती एक प्रकारचे वलय असते. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. पोकळ दिमाख टाळला पाहिजे.
व्यवसाय:- न्यायाधीश, सचिव, सामाजिक कार्यकर्ता, धार्मिक गुरु, शिक्षक, कारखानदार, सावकार, जाहिरात वितरक, अभिनेता, मॅनेजिंग डायरेक्टर.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- अंजिरी, पिवळा आणि जांभळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेठीस्ट आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६. कार्तिक शुक्ल द्वादशी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. संपर्क - 8087520521
*भागवत एकादशी, चातुर्मास समाप्ती, तुलसी विवाह आरंभ, पंढरपूर यात्रा.*
चंद्र नक्षत्र - उत्तरा भाद्रपदा / सकाळी ६.५१ नंतर रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.
आजचा दिवस - आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. चंद्र प्रतियुती शुक्र योगामुळे कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंधांमध्ये काही मतभेद किंवा भावनिक चढ-उतार जाणवण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी. नोकरी-व्यवसायात काम करताना संयम आणि योग्य नियोजन आवश्यक राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा ठेवणे हिताचे ठरेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
ग्रहयोग - चंद्र प्रतियुती शुक्र.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी. नोकरी-व्यवसायात काही अडथळे जाणवू शकतात. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अचानक खर्च उद्भवू शकतात. मालमत्तेच्या संदर्भात निर्णय विचारपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) भागीदारीच्या व्यवसायात काही मतभेद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा ठेवावा. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. आर्थिक व्यवहार स्पष्टपणे करा. नवीन करार करताना सावधगिरी बाळगा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष द्यावे. संततीच्या संदर्भात काही चिंता निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधात गैरसमज टाळा. कलात्मक कामात चांगली प्रगती होईल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा.
तूळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती वातावरणात काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या संदर्भात निर्णय घेताना घाई करू नका. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात संयमाने काम करणे हिताचे ठरेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) भावंडांशी उत्तम संबंध राहतील. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. नवीन लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. महत्त्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक हाताळा.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक परिस्थितीत काही चढ-उतार संभवतात. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, वैयक्तिक संबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवणे आवश्यक आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दूरच्या प्रवासाचे योग येतील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) चंद्र तुमच्या राशीत असल्याने भावनिकता वाढू शकते. नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. वैयक्तिक संबंधांमध्ये संयम राखणे हिताचे ठरेल.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
.jpg)
Comments
Post a Comment