आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य

सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६.



२३ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-


     तुमच्यावर बुध आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सतत उद्योगमग्न असतात. तुमचे शब्द भांडार चांगले असते. इतरांवर हुकूमत गाजवतात. तुमच्या शब्दात आणि कृतीत ठामपणा आहे. लेखन, भाषण आणि शिकवणे यात तुमचा हातखंडा असतो. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असतात. सर्व गोष्टी झटपट करणे आवडते. एरवी तुम्ही मितभाषी असतात. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती असते. वडिलोपार्जित संपत्ती मिळते. स्मरणशक्ती चांगली असते. तुम्ही अत्यंत कृतिशील आणि बुद्धिमान आहात. तुम्हाला अनेक खेळांची आवड असते. तुम्ही समाजप्रिय असतात. कितीही प्रतिकुलता असली तरी तिला तोंड देण्याची तुमच्या तयारी असते. तुम्हाला नाविन्य आणि प्रवास यांची आवड आहे. मित्रांबद्दल तुम्हाला थोडे जास्तच प्रेम असते आणि तुम्ही नेहमीच त्यांची बाजू घेतात. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला दया वाटते. तुम्हाला लहान मुले आणि निसर्ग प्रिय असतो. तुम्ही हुशार, तल्लख आणि शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि तुम्ही झटपट काम पूर्ण करतात. हाती घेतलेल्या कामात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. धर्म आणि तत्त्वज्ञान यांची तुम्हाला गोडी असली तरी परंपरा फारशी आवडत नाही. तुम्ही कष्टाळू आहात. स्वतःच्या व्यवसायात जास्त यश मिळते. जुगार, सट्टा याचा मोह टाळला पाहिजे. वरिष्ठ लोकांकडून तुम्हाला संरक्षण मिळते. अज्ञातमीक वृत्ती वाढवावी आणि त्यातूनलोकांची दुःखे दूर करावीत असे तुम्हाला वाटत असते. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी असते. उषा आणि चिकाटी असते मात्र स्वभाव काहीसा दुराग्रही असू शकतो. 



व्यवसाय:-  डॉक्टर, इंजिनिअर, यंत्रसामुग्रीचा व्यवसाय, बँकिंग, पतपेढी, डिपार्टमेंटल स्टोअर, सचिव, वकील.


शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार आणि शनिवार.


शुभ रंग:- हिरवा आणि पांढरा.


शुभ रत्न:- हिरा, पाचू, मोती.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६. कार्तिक शुक्ल चतुर्दशी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.


वैकुंठ चतुर्दशी, कार्तिक स्वामी दर्शन.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. संपर्क - 8087520521


आज चांगला दिवस आहे. रवी त्रिकोण नेपच्यून योगामुळे कल्पनाशक्ती, आध्यात्मिकता आणि अंतर्ज्ञानाला चालना मिळेल. चंद्र प्रतियुती बुध योगामुळे संवादात काही गैरसमज किंवा विचारांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी. महत्त्वाचे निर्णय घेताना स्पष्ट विचार आणि संयम ठेवणे हिताचे ठरेल.


नक्षत्र - भरणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष.


ग्रहयोग - रवी त्रिकोण नेपच्यून, चंद्र प्रतियुती बुध.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र तुमच्याच राशीत असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, बोलताना संयम ठेवा.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) मित्रमंडळींकडून उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) नोकरी-व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. प्रवासाचे योग येतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी. अचानक खर्च उद्भवू शकतात. मालमत्तेच्या संदर्भात निर्णय विचारपूर्वक घ्या. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.


तूळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) भागीदारीच्या व्यवसायात अनुकूलता राहील. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नवीन करार करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मात्र, संवादात गैरसमज टाळा.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) कामाचा व्याप वाढू शकतो. सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. नियोजनपूर्वक काम केल्यास यश मिळेल.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) बौद्धिक आणि कलात्मक कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेच्या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकतात. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. घरातील प्रलंबित कामे मार्गी लागतील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) तुमच्या पराक्रमात आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. नवीन लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नवीन वस्तूंच्या खरेदीचे योग आहेत. आर्थिक व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, बोलताना स्पष्टता ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा.


कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments