तिरुपती मंदिराला जैन दाम्पत्याकडून २०८ कोटींचे सुवर्णदान!

 

तिरुपती मंदिराला जैन दाम्पत्याकडून २०८ कोटींचे सुवर्णदान!



भगवान व्यंकटेश्वरांना १२१ किलो सोन्याचे दागिने अर्पण; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत दानविधी

तिरुपती 27 सिटी न्यूज नेटवर्क 

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिरात चेन्नईतील परोपकारी जैन दाम्पत्याने तब्बल २०८ कोटी रुपये किमतीचे १२१ किलो सोन्याचे दागिने दान केले आहेत. वर्धमान जैन आणि राधिका जैन असे या दाम्पत्याचे नाव असून, त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह भगवान व्यंकटेश्वरांच्या चरणी ही सुवर्णभेट अर्पण केली.



आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत हा दानविधी पार पडला. सोन्याच्या दागिन्यांचे एकूण वजन १२१ किलो असून त्यांची अंदाजित किंमत २०८ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

तिरुमला मंदिराच्या इतिहासातील ही सर्वात मोठ्या देणग्यांपैकी एक मानली जात आहे. या भव्य सुवर्णदानामुळे मंदिर परिसरात या दानाची विशेष चर्चा सुरू झाली आहे.

धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक दातृत्वाचा संगम घडवणाऱ्या या दानामुळे जैन दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments