गोकुळ दूध आता महागले! तब्बल ६ रुपयांनी वाढ; २१ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी
कोल्हापूर 19 सिटी न्यूज नेटवर्क
महागाईचा फटका आता थेट सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या दूध दरात तब्बल ६ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीची अंमलबजावणी येत्या २१ नोव्हेंबरपासून होणार आहे.
गोकुळच्या दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांसह ग्राहकांनाही या दरवाढीचा परिणाम जाणवणार आहे. दुधाच्या दरात झालेल्या या वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या घरखर्चाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.
आधीच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशातच दूध दरात तब्बल ६ रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
दूध ही प्रत्येक कुटुंबाची दैनंदिन गरज असल्याने या दरवाढीचा परिणाम सर्वच स्तरांतील ग्राहकांना जाणवणार आहे.
एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे दुधाचे वाढलेले दर... आता ग्राहकांना दूध खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
२१ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या या दरवाढीकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment