आजचे राशीभविष्य
गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६
२६ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये आणि आजचे बारा राशीचे भविष्य:-
तुमच्यावर शनी आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. मोठ्या योजना पार पाडणे तुम्हाला सहज जमते. तुमचा स्वभाव उत्स्फूर्त आहे. प्रवासाची आवड असते. तुम्ही इतरांपेक्षा अधिक धोरणी आणि मुत्सद्दी आहात. तुम्ही उत्कृष्ट संघटक आणि विचारी आहात. स्वाभिमानी आहात. गूढ विद्या, जादूटोना याची आवड असते. इतरांना तुम्ही सहज माफ करतात मात्र कधीकधी छोटी बाब लावून धरतात. वागणे आक्रमक असते. तुम्ही संमिश्र गुणांचे आहात. शांतता आणि एकांत तुम्हाला आवडतो. शास्त्रीय संगीताची आवड असते. शिस्त, टापटीप, नियमितपणा आवडतो. जीवनाचा खोलवर विचार करून भविष्याचे निर्णय विचारपूर्वक घेतात. तुम्ही धोरणी आणि मुत्सद्दी आहात. धाडसी, आक्रमक आणि तत्पर आहात. तुमचाउद्देश चांगला असतो मात्र मुद्देसूद बोलता येत नाही. खेळांची आणि व्यायामाची आवड असते. तुम्ही समतोल विचारांचे, कडक शिस्तीचे, निश्चयी, कर्तव्यतत्पर आणि कार्यक्षम आहात. तुम्ही संशयी असू शकतात आणि तुमच्या बाबत बरेच गैरसमज असतात. मनातून एकटे असतात. मैत्रीला जगणारे आहात मात्र स्वभाव तापट आहे. जीवनात अडचणी आणि विलंब याचा अनुभव येतो. इतरांना वेळेला मदत केली तरी तुमच्या वेळी इतर लोक येत नाहीत त्यामुळे कधीकधी जीवनात नैराश्य येते. संशोधनात तुम्हाला रस असतो. ज्ञान मिळवण्याची आवड असते. व्यक्तिमत्व आकर्षक असते खोटेपणा आवडत नाही. मित्रांचा सहवास तुम्हाला प्रिय असतो. छानछोकी आणि उंची कपडे वापरणे यांकडे कल असतो. मनाने चंचल आणि लहरी आहात. व्यसने आणि प्रलोभने टाळली पाहिजेत.
व्यवसाय:- इंजिनिअर, राजकारण, लाकूड, कोळसा, भौतिक शास्त्र, गणित, संशोधन, लेखन, रेल्वे, परिवहन.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:- राखाडी, काळा, निळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
![]() |
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६. कार्तिक कृष्ण द्वितीया / दुपारी १.१६ नंतर तृतीया. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
चंद्र नक्षत्र - मृग / संध्याकाळी ५.४७ नंतर आर्द्र.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ / सकाळी ७.११ नंतर मिथुन.
आजचा दिवस - उत्तम दिवस आहे. चंद्र लाभ मंगळ आणि चंद्र लाभ गुरू योगामुळे कामात उत्साह, आत्मविश्वास आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. चंद्र त्रिकोण शुक्र योगामुळे आर्थिक लाभ, कौटुंबिक सौख्य आणि प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. चंद्र केंद्र शनी योगामुळे कामात काही जबाबदाऱ्या वाढतील; मात्र संयम आणि नियोजनाने त्यावर मात करता येईल. चंद्र केंद्र नेपच्यून योगामुळे काही बाबतीत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना व्यवहारज्ञानाचा उपयोग करा. नोकरी-व्यवसायातील नवीन कामे सुरू करण्यासाठी आणि आर्थिक नियोजनासाठी दिवस अनुकूल आहे.
ग्रहयोग - रवी षडाष्टक चंद्र, चंद्र लाभ मंगळ, चंद्र लाभ गुरू, चंद्र त्रिकोण शुक्र, चंद्र केंद्र शनी, चंद्र केंद्र नेपच्यून.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) सकाळी ७.११ नंतर चंद्र तुमच्या राशीतून पुढे जात असल्याने कामाच्या बाबतीत नवीन उत्साह निर्माण होईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) सकाळी ७.११ नंतर चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करीत असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक होईल. मात्र, निर्णय घेताना संयम ठेवा.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमवाल. प्रवासाचे योग येतील. नोकरी-व्यवसायात नियोजनपूर्वक काम केल्यास यश मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी होतील.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. वरिष्ठांकडून सहकार्य आणि कौतुक मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.
तूळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. दूरच्या प्रवासाचे योग येतील. नवीन कामात यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) आर्थिक व्यवहारात अनुकूलता राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. मात्र, आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. नवीन करार करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. कामात शिस्त आणि नियोजन ठेवा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. कला आणि सर्जनशील क्षेत्रात चांगले यश मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) घरगुती वातावरण आनंदी राहील. घर आणि मालमत्तेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. घरातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
.jpg)

Comments
Post a Comment