आजचे राशीभविष्य
शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६
२७ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये आणि आजचे बारा राशींचे भविष्य:-
तुमच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व संमिश्र आहे. काही वेळेस ते विरोधाभासी असते. तुम्ही अत्यंत भावनाप्रधान आणि लहरी आहात.तुमची वृत्ती अभ्यासू आहे. शेजाऱ्यांशी तुमचे फारसे जमत नाही. तुम्ही स्वाभिमानी आहात. तुम्ही सभ्य आणि मोठ्या मांचे आहात. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती असते. तुम्ही करारी आहात आणि तुमच्यात चिकाटी असते. तुम्ही निर्भय आहात. तुम्ही अत्यंत आक्रमक, लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्हाला पराभव बघावा लागत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यावर तुम्ही मात करू शकतात.तुम्ही स्पष्टवक्ते आणि परखड आहात. बोलण्यात नाजूकपणा नसतो. तुम्हाला मैदानी खेळांची आणिशक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्ही शूर असतात आणि मित्रांना तुमचा आधार वाटतो. तुम्हाला लहान मुले, प्राणी प्रिय असतात. तुमची मनशक्ती प्रचंड असतेआणि तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्ही भरपूर प्रवास करतात आणि त्यातून अनुभव समृद्ध होतात. तुम्ही अभ्यासू आहात. शीघ्रकोपी आहात. तुमचे विचार जगाच्या पुढे असतात. तत्वांवर तुम्ही ठाम असतात. तुम्हाला गुप्त शत्रूंची भीती असते. कोर्ट कचेरी पासून सावध राहावे. इतरांचा सल्ला तुम्हाला फारसा आवडत नाही. वडिलोपार्जित संपत्ती मिळते. वैवाहिज जीवनात समस्या निर्माण झल्यास त्याचा जीवनावर मोठा परिणाम होतो. भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असते. सखोल वृत्ती आणि तत्वज्ञानची आवड असते. तुम्ही न्यायी आहेत.
व्यवसाय:- राजकीय नेता, खेळाडू, केमिस्ट, इंजिनीअर, बांधकाम, खनिज.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळावर, गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा, तांबडा, पांढरा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६. कार्तिक कृष्ण तृतीया / सकाळी ९.४९ नंतर चतुर्थी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
चंद्र नक्षत्र - आर्द्रा / दुपारी ३.०९ नंतर पुनर्वसू.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.
विशेष - आज क्षय तिथी असून *संकष्टी चतुर्थी आहे.* चंद्रोदय - रात्री ८.५१.
आजचा दिवस - चांगला दिवस आहे. चंद्र त्रिकोण बुध योगामुळे बुद्धिचातुर्य, संवादकौशल्य आणि निर्णयक्षमता वाढेल. बौद्धिक कामे, लेखन, व्यवहार आणि आर्थिक नियोजनासाठी दिवस अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा केल्यास फायदेशीर ठरेल. रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहा. संकष्टी चतुर्थीनिमित्त धार्मिक कार्यात मन रमवाल. गणेश उपासना आणि चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करून व्रताची सांगता करणे शुभ ठरेल.
ग्रहयोग - चंद्र त्रिकोण बुध.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक व्यवहारात अनुकूलता राहील. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. धनलाभाच्या संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. वाणीतील प्रभावामुळे कामे सोपी होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र त्रिकोण बुध योगामुळे बुद्धिचातुर्य आणि निर्णयक्षमता वाढेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमवाल. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. वरिष्ठांकडून सहकार्य आणि कौतुक मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. तुमच्या बुद्धिचातुर्यामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
तूळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. दूरच्या प्रवासाचे योग येतील. नवीन कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) आर्थिक व्यवहारात अनुकूलता राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मात्र, गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. नवीन करार करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. कला आणि सर्जनशील क्षेत्रात चांगले यश मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घर आणि मालमत्तेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. घरातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सुखात वाढ होईल.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
8087520521
.jpg)
Comments
Post a Comment