झोकून दिल्यास यश आपलेच – सतीशकुमार
4X4 कोल्हापूर स्पोर्टस क्लबतर्फे सत्कार
![]() |
| 4X4 कोल्हापूर स्पोर्टस क्लबच्या वतीने सतीशकुमार-वर्षा नायरन यांच्या सत्कारप्रसंगी हेमंत शहा, अश्विन शिंदे, प्रशांत काशीद, चित्तेश मंडोडी आदी. |
कोल्हापूर, ता. ५ सिटी न्यूज नेटवर्क
क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये झोकून देऊन काम केल्यास यश आपलेच आहे, असा आशावाद सतीशकुमार यांनी व्यक्त केला.
मूळचे आर्किटेक्ट असलेले व ऑफ-रोड हा साहसी खेळ मोठा करणेच्या उद्देशाने कोल्हापूर येथे आलेले सतीशकुमार-वर्षा नायरन या दांपत्याचा 4X4 कोल्हापूर स्पोर्टस क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सात वेळा आरएफसी स्पर्धेत भाग घेतलेले सतीश कुमार म्हणाले, रेन फॉरेस्ट चॅलेंज या स्पर्धेत मी सातवेळा भाग घेतला आहे. त्यामध्ये 2022 सालचा मी विजेता आहे. गोवा येथे जुलैमध्ये मुसळधार पावसात होणाऱ्या या स्पर्धेत सात दिवस 60 स्पर्धकांमधून 25 विविध प्रकारच्या ऑफ रोड ट्रॅकवर आपले कौशल्य सिद्ध करावे लागते. जंगलात होणाऱ्या या मी व चेतन चिंगप्पा यांनी विजय मिळवला आहे. विजेता म्हणून मलेशियात होणाऱ्या आरएफसी ग्रँड फायनलनध्ये मोफत प्रवेळ मिळाला.
4X4 कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे विनायक शिंदे म्हणाले, "गगनबावडासारख्या घाटात अशा ऑफ-रोड चॅलेंजसाठी नैसर्गिक ट्रॅक उपलब्ध आहेत. आरएफसीच्या धर्तीवर आम्ही कोल्हापुरात 'रेड मड 4x4 ऑफ-रोड चॅलेंज' आणि 'गगनबावडा बाईक राईड 2027' चे आयोजन करत आहोत. यातून पर्यटनाला चालना मिळेल."
दरम्यान, प्रकाश डोंगरकर यांच्या कळंबा येथील व्यंकटेश लॉन आणि अग्रो टुरिझम येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विनायक शिंदे यांच्यासह हेमंत शहा, चित्तेश मंडोडी, अश्विन शिंदे, प्रशांत काशीद, कुणाल धुम्मा, दिग्विजय लोळगे, जयदीप गुरव आदी उपस्थित होते.dd

Comments
Post a Comment