स्वयंप्रेरिकेचा ३२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 

स्वयंप्रेरिकेचा ३२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा



विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव

कोल्हापूर 25  सिटी न्यूज नेटवर्क 

स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेचा ३२ वा वर्धापनदिन २४ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला तसेच संस्थेच्या कार्यात योगदान देणाऱ्या सदस्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कोरगावकर ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सौ. पल्लवी कोरगावकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यामध्ये सेवाभावी कार्यकर्ती म्हणून सुलभा नलवडे, ज्येष्ठ उद्योजिका म्हणून विभा देशपांडे, उत्तम हस्तकला म्हणून सुनीता नांगरे, उत्तम उद्योजिका म्हणून संगीता राणे, उत्तम फराळ ऑर्डर पुरवणाऱ्या म्हणून उज्वला पाटील, तर सर्वाधिक फराळ ऑर्डर मिळवून देणाऱ्या म्हणून हरिप्रिया दिवेकर यांचा गौरव करण्यात आला.

तसेच नवीन उत्तम पुरवठादार म्हणून सुषमा चेचर, लक्ष्मी आकुरवाड, अनुराधा कातवारे, सुजाता डुणुंग आणि प्रणोती सुतार यांना सन्मानित करण्यात आले.



वर्धापनदिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सुवर्णा जाधव, सई काटकर, मृदुला होसूर, रोहिणी टोपराणी, गायत्री शिंगाडे आणि काजल पवार यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आदित्य होसूर आणि विद्या काटकर यांनी एकपात्री नाटुकले सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या तज्ञ संचालिका अंजली घोरपडे यांनी केले. यावेळी स्वयंसिद्धा, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन तसेच स्वयंप्रेरिका संस्थेच्या सर्व संचालिका, संस्थेचे सभासद आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया भोसले यांनी केले. महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या या वर्धापनदिन सोहळ्याची उत्साहात सांगता झाली.

Comments