सीमा भागातील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी २० नोव्हेंबरला धरणे आंदोलन ! - महाराष्ट्र एकीकरण समिती
सीमा भागातील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी २० नोव्हेंबरला धरणे आंदोलन ! - महाराष्ट्र एकीकरण समिती
कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क
गेली ७ दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटलेला नाही. या प्रश्नासाठी तीन पिढ्यांनी लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन, मोर्चे, कारागृह भरा यांसह विविध मार्गांनी आंदोलने केली आणि १०० हून अधिक जण हुतात्मा झाले. गेली २० वर्षे झाली हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असून सीमाभागातील लोकांना न्याय कधी मिळेल याची शाश्वती नाही. तरी सीमा भागातील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी २० नोव्हेंबरला दसरा चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या प्रसंगी बेळगाव जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री. बाबासाहेब खांबे, श्री. नंदकुमार कांबळे, डॉ. अच्युत माने, महाराष्ट्र एकीकरण समितीचे निपाणीचे अध्यक्ष श्री. जयराम मिरजकर, तसेच श्री. अशोक पोळ-पाटील उपस्थित होते.

Comments
Post a Comment